'Taarak Mehta...' टप्पू आणि बबिताच्या या फोटोमुळे पुन्हा चर्चांना उधाण

बबिता आणि टप्पूच्या रिलेशनशिपच्या चर्चांनंतर दोघांचा हा फोटो व्हायरल

Updated: Oct 23, 2021, 11:59 AM IST
'Taarak Mehta...' टप्पू आणि बबिताच्या या फोटोमुळे पुन्हा चर्चांना उधाण  title=

मुंबई : टीव्हीची सर्वात लोकप्रिय कॉमेडी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' टीआरपीच्या यादीत टॉप 3मध्ये बऱ्याच वर्षांपासून आहे. मालिका प्रसारित होऊन 13 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. मालिकेतील पात्रे देखील लोकांच्या हृदयाच्या इतक्या जवळ आहेत की लोक त्यांना वास्तविक मानतात. टप्पूसेनेची मस्ती आणि गोकूळ धाम सोसायटीमधील एकता... या कारणामुळे आज देखील ही मालिका प्रेक्षकांच्या आयुष्यातील एक भाग आहे. एवढंच नाही तर मालिकेतील कलाकारांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. 

मालिकेतील टप्पू त्याच्या खोडकर स्वभावामुळे तर बबिता तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी  बबीता जी (Munmun Dutta) आणी टप्पू (Raj Anadkat) यांच्या नात्याच्या चर्चा जोरदार रंगल्या होत्या. आता पुन्हा त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या दोन्ही कलाकारांच्या अफेअरच्या बातम्या व्हायरल झाल्यानंतर मुनमुन दत्ताने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना फटकारले. तिने या बातमीला अफवा असल्याचे म्हटले. यानंतर राज यांनेही अफेअरची बातमी खोटी असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले आहे.