Tabu Got Troll over Her New Look : बॉलिवूड अभिनेत्री तब्बूचे आजही लाखो चाहते आहेत. तब्बू फक्त तिच्या सुंदरतेसाठी नाही तर तिच्या नॅच्युरल ब्युटीसाठी देखील ओळखली जाते. तब्बूचं वय होतं असलं तरी देखील तिच्या चेहऱ्यावर तारुण्य आणि ग्लो आजही दिसतो. तिला पाहून कोणाला तिच्या वयाचा अंदाज येणार नाही. अशात तब्बूनं नुकतंच एक फोटोशूट केलं. त्यात तिला पाहून काहींना आश्चर्य झालं. तर दुसरीकडे असे देखील फोटो आहेत जे पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. अनेकांचं म्हणणं आहे की तिला जो मेकअप केला आहे तो खूप घाणेरडा आहे. जाणून घेऊया काय आहे प्रकरण...
तब्बूनं नुकतंच 'वोग इंडिया मॅगजीन' च्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केलं. त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं. त्याचं काही फोटो प्रेक्षकांना प्रचंड आवडले. तर तिचा मेकअपचा फोटो नेटकऱ्यांना आवडला नाही. या फोटोत तब्बू संपूर्ण वेगळी दिसते असं त्यांचं म्हणणं आहे. तिचा खूप मेकअप करुन तिची नॅच्युरल ब्यूटी खराब केल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
तब्बूच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत संताप व्यक्त केला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की इतका मेकअप का केलाय? दुसरा नेटकरी म्हणाला की "तुम्ही तिच्यासोबत हे काय केलं?" काही नेटकरी म्हणत आहेत की "तब्बूचा मेकअप खूप जास्त खराब केलाय. त्यामुळे तिची सुंदरता गेल्यासारखं वाटतंय." एक नेटकरी म्हणाला की 'असे फोटो डिलीट केले पाहिजे पोस्ट नाही...'दरम्यान, तब्बूचे दुसरे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. ते फोटो पाहून तिचं वय 52 आहे हे कळत नाही. तर काहींनी म्हटलं की या वयातही तब्बू खूप सुंदर दिसते.
हेही वाचा : 'मीही कोणाची तरी मुलगी, बहिण, बायको आहे; थोडी लाज बाळगा", अमृता खानविलकर कोणावर संतापली?
दरम्यान, तब्बूच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती नुकतीच 'क्रू' या चित्रपटात दिसली. यात ती करीना कपूर आणि क्रिती सेननसोबत दिसली होती. या चित्रपटात कपिल शर्मा आणि दिलजीत दोसांझ हे कलाकर देखील दिसले. तिचा आगामी चित्रपट 'औरों में कहां दम था' आहे. यात ती मोहिनीच्या भूमिकेत दिसली होती. तिनं तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे.