close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

तूच माझं बलस्थान, कॅन्सरग्रस्त पत्नीसाठी आयुषमानची भावनिक पोस्ट

ताहिरा माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा.

Updated: Jan 30, 2019, 01:16 PM IST
तूच माझं बलस्थान, कॅन्सरग्रस्त पत्नीसाठी आयुषमानची भावनिक पोस्ट

मुंबई : अभिनेता आयुषमान खुराना बॉलिवू़डमध्ये उत्तम अभिनय कौशल्य आणि आकर्षक व्यक्तीमत्वासाठी ओळखला जातो. चित्रपटांतून नवनवीन भूमिका साकारत प्रेक्षकांमध्ये त्याने स्वत:ची वेगळी छाप उमटवली आहे. आयुषमान एक कलाकार म्हणून जितका संपन्न आहे, तितकाच खऱ्या जीवनात तो एक जबाबदार पती म्हणूनही प्रेक्षकांची मनं जिकंत आहे. 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हे चॅलेंज स्विकारत आयुषमानने त्याच्या पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने, 'माझ्यासाठी ताहिरा सर्वात मोठी प्रेरणा आहे. ती हुशार, नि:स्वार्थी, आणि बोल्ड आहे' असं त्याने लिहिलं आहे. 

गेल्या वर्षी आयुषमान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यप हीला स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं. त्यानंतर या संघर्षात प्रत्येकवेळी तो ताहिराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. कर्करोगाचे निदान झाल्यापासून ताहिराच्या लढाऊ वृत्तीला आपली ताकद करत आयुषमान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. नेहमी वेगवेगळ्या पोस्ट करून तो ताहिराला प्रोत्साहन देत असल्याचं पाहायला मिळतं. ताहिराच्या वाढदिवशीही आयुषमानने 'अशीच प्रेरणा देत राहा' असं कॅप्शन लिहत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

 
 
 
 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on

कर्करोगाचं निदान झाल्यापासून ताहिरा कॅन्सरशी लढा देत आहे. तिच्यावर उपचारही सुरु आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत आपल्या प्रकृतीविषयी सर्वांना माहितीही देत असते. ताहिरानेही कर्करोगला मोठ्या धीराने आणि सकारात्मक दृष्टीने सामोरी जात आहे.