close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बुद्धांच्या मूर्तीसह आक्षेपार्ह फोटो पोस्ट करणाऱ्या ताहिराचा अखेर माफीनामा

अतिशय नम्रपणे तिने आपली बाजू सर्वांसमोर मांडली आहे.

Updated: Jun 19, 2019, 04:54 PM IST
बुद्धांच्या मूर्तीसह आक्षेपार्ह फोटो पोस्ट करणाऱ्या ताहिराचा अखेर माफीनामा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप सध्या चर्चेत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्करोगासारख्या आजारावर मात करणारी ताहिरा एका वादामुळे चर्चेत आली आहे. ताहिराने काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक असा फोटो शेअर केला होता ज्यामुळे अनेक लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या फोटोवरुन तिला अनेकांनी खडेबोलही सुनावले आहेत. परंतु अनेकांकडून करण्यात आलेल्या ट्रोलिंगनंतर आता ताहिराने त्याबाबत जाहीरपणे माफी मागितली आहे.

भगवान बुद्धांच्या मूर्तीवर बसलेला फोटो शेअर केल्यामुळे लेखिका ताहिरा कश्यपला ट्रोल करण्यात येत आहे. त्यावर ताहिराने 'अजाणतेपणाने लोकांना नाराज केल्यामुळे' माफी मागितली आहे. ताहिराने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, ज्यात ती भगवान बुद्धांच्या मूर्तीवर बसली होती. सोशल मीडियावर या फोटोला नकारात्मक प्रतिक्रिया येत होत्या. त्यानंतर हा फोटो इन्स्टाग्रामवरुन डिलीट करण्यात आला आहे.

'मी कधी कोणाच्याही दु:खाचं कारण होऊ इच्छित नाही. अजाणतेपणाने लोकांच्या भावना दुखावल्यामुळे मी माफी मागते. सर्वांसाठी प्रेम आणि शांतीची मागणी करते.' असं म्हणत तिने सर्वांची जाहिरपणे माफी मागितली आहे.

 
 
 
 

A post shared by tahirakashyapkhurrana (@tahirakashyap) on

ही पोस्ट ताहिराने ट्विटर आणि इन्स्टाग्राम दोन्हीकडे शेअर केली आहे. अतिशय नम्रपणे तिने आपली बाजू सर्वांसमोर मांडली आहे. गेल्या वर्षी झालेल्या ब्रेस्ट कॅन्सरवर मात करत ताहिरा आता पुन्हा कामाकडे वळली आहे. तिने एका म्यूझिक व्हिडिओचं दिग्दर्शन केलं असून त्यात आयुष्मान खुरानाचा भाऊ आणि ताहिराचा दीर अपारशक्ती खुराना काम करणार आहे.