हॉटेलमध्ये पर्स घेतली, बिलही भरलं पण मुलालाच विसरले....; लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीचा मोठा खुलासा

ती तिच्या स्वत:च्या मुलालाच विसरली होती.

Updated: Oct 25, 2021, 12:57 PM IST
हॉटेलमध्ये पर्स घेतली, बिलही भरलं पण मुलालाच विसरले....; लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीचा मोठा खुलासा
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सेलिब्रिटी आणि त्यांच्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टी या इतरांसाठी कायमच चर्चेचा विषय ठरतात. त्यातच काही सेलिब्रिटी मंडळी इतकी दिलखुलास असतात की, त्यांच्यासोबत घडलेल्या अशा प्रसंगाचा उलगडा ते स्वत:च करतात. अशाच काही चेहऱ्यांपैकी एक नाव म्हणजे ताहिरा कश्यप.

अभिनेता आयुष्मान खुराना याची पत्नी, ताहिरा हिनं नुकताच मोठा खुलासा केला आहे. पहिल्या प्रसुतीनंतर मातृत्त्वाची जबाबदारी नव्यानंच सांभाळणाऱ्या ताहिराकडून नकळतच मोठी चूक घडली होती. ही चूक मोठी होती, कारण एके ठिकाणी गेलं असता ती तिच्या स्वत:च्या मुलालाच विसरली होती.

पहिला मुलगा, विराजवीर याच्या जन्मानंतर ताहिरा मित्रमंडळींसमवेत जेवणासाठी बाहेर गेली होती. तिथून निघताना तिनं सर्वांना मिठी वगैरे मारली आणि परतण्यासाठी म्हणून लिफ्टची वाट धरली. त्याचवेळी तेथील कर्मचाऱ्यांपैकी एकजण ताहिराकडे धावत आला. लिफ्टच्या बंद होणाऱ्या दरवाज्यामध्ये पाय ठेवून त्यान लिफ्ट थांबवली. आणि, मॅडम तुम्ही तुमचं बाळ विसरलात, असं तो म्हणाला. त्यावेळी तिथं असणारे सर्वजण तिच्याकडे विचित्र नजरेनं पाहत होते. ‘लोकं बिल भरायला विसरलतात, काहीजण बॅगा विसरतात. मी मात्र बॅग घेऊन माझ्या मुलालाच विसरले होते. असं काही तरी कोणती आई करते’, असं ताहिरा त्यावेळी म्हणाली.

'I forgot my child in a restaurant': Tahira Kashyap opens up on blunders she did as a new mom

अभिनेता आयुष्मान खुराना आणि ताहिरा यांच्या जीवनात त्यांचा मुलगा विराजवीर याचा जन्म 2012 मध्ये झाला होता. यानंतर त्यांना एक मुलगीही झाली. आता तिचं वय 7 वर्षे इतकं असून, वरुष्का असं तिचं नाव आहे.