close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

या पाकिस्तानी क्रिकेटरसोबत तमन्ना करतेय शॉपिंग ?

नवी दिल्ली : आजकाल सोशल मीडियावर 'बाहुबली-2' फेम तमन्ना भाटिया चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे तिचे लग्न. असे ऐकण्यात आले आहे की, तमन्ना सध्या पाकिस्तानचा माजी क्रिकेटर अब्दुल रज्जाकसोबत लग्नाची खरेदी करत आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 1, 2017, 05:26 PM IST
या पाकिस्तानी क्रिकेटरसोबत तमन्ना करतेय शॉपिंग ?

नवी दिल्ली : आजकाल सोशल मीडियावर 'बाहुबली-2' फेम तमन्ना भाटिया चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे तिचे लग्न. असे ऐकण्यात आले आहे की, तमन्ना सध्या पाकिस्तानचा माजी क्रिकेटर अब्दुल रज्जाकसोबत लग्नाची खरेदी करत आहे. या दोघांचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात दोघे ज्वेलरी शॉपमध्ये शॉपिंग करताना दिसत आहेत. 

या फोटो व्हायरल झाल्यावर त्या दोघांच्या अफेरच्या चर्चेला उधाण आले आणि हे दोघे लवकरच लग्न करणार असून त्याचीच शॉपिंग करत आहेत, अशा अफवा देखील पसरल्या. मीडिया वृत्तानुसार हा फोटो २०१३ चा असून हे दोघे शॉपिंग नाही तर दुकानाच्या उदघाटनासाठी एकत्र गेले होते. 

Tamanna Bhatia and Abdul Razzaq

या सगळ्यावर तमन्नाची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाक विवाहीत आहे. तमन्ना भाटिया आगामी तेलगू चित्रपट 'जय लव कुश' मध्ये एका खास गाण्यात दिसून येईल. बॉबी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २१ सेप्टेंबरला प्रदर्शित होईल.