तापसीला हेलमेट न घातल्यामुळे भरावा लागला दंड

तापसी पन्नू सध्या चांगलीचं चर्चेत आली आहे.  

Updated: Nov 18, 2020, 10:33 PM IST
तापसीला हेलमेट न घातल्यामुळे भरावा लागला दंड title=

मुंबई : 'पिंक', 'बदला', 'थप्पड' इत्यादी चित्रपटांच्या मध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री तापसी पन्नू सध्या चांगलीचं चर्चेत आली आहे. कायम सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या 
तापसीने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती हेलमेट न घालता दुचाकी चालवताना दिसत आहे. तिचा हा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'हा फोटो काही काळापूर्वीचाच आहे जेव्हा मला हेल्मेट न घातल्याबद्दल दंड आकारण्यात आला होता' असं लिहिलं आहे. डेनिम शर्ट घातलेल्या फोटोमध्ये तापसीचा अंदाज काहिसा हटके दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

'रश्मी रॉकेट'च्या शूटिंगदरम्यान काढलेला फोटो पोस्ट करत तापसी लिहिते, 'एका ठिकाण्याहून दुसरीकडे जाण्याचा प्रवास'.  तापसीच्या या फोटोवर कलाविश्वातील अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत. 

तापसी सध्या तिच्या 'रश्मी रॉकेट' चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटामध्ये तापसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवाय चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आकाश खुराना यांच्या खांद्यावर आहे. 'रश्मी रॉकेट' २०२१मध्ये रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.