मुंबई : तनुश्री दत्ता - नाना पाटेकर प्रकरणानंतर इंडस्ट्रीतील अनेक महिलांनी मोठा खुलासा केला आहे. विकास बहल, रजत कपूर आणि कैलास खेर सारख्या कलाकारांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावण्यात आले. हॉलिवूडपाठोपाठ आता बॉलिवूडमध्ये देखील #metoo ही चळवळ सुरू झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे #metoo च्या या चळवळीचे संस्कारी बाबा आलोकनाथ शिकार झाले आहेत.
टीव्ही शो 'तारा' ची निर्माती आणि लेखिकेने आलोकनाथ यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने हा खुलासा केला आहे. तिने फेसबुकवर ही पोस्ट लिहीली आहे या पोस्टमध्ये आलोकनाथ यांचं नाव न घेता आरोप केले आहेत.
तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, जेव्हा मी 1994 साली 'तारा' या मालिकेसाठी लिहीत होती आणि निर्मीती करत होते तेव्हा माझ्यासोबत शारीरिक दुर्व्यवहार करण्यात आला. या पोस्टम्ये तिने काही अशा गोष्टी लिहील्या आहेत ज्या वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या संपूर्ण पोस्टमध्ये तिने कुठेच आलोकनाथ यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही पण ही पोस्ट वाचल्यामुळे तुम्हाला कळेल की तिने कुणावर निशाणा साधला आहे.
My heart goes out to what you would have gone through @vintananda. Alone. While many in the industry would have heard the whispers and yet been too scared to call that monster #AlokNath out.
— Shobha Sant (@ShobhaIyerSant) October 9, 2018
या पोस्टवर आलोकनाथ यांनी देखील उत्तर दिलं आहे. जेव्हा एक महिला पुरूषावर आरोप लावते तेव्हा पुरूषाचं म्हणणं कधीच महत्वाचं नसतं. मी विंताला चांगल्याप्रकारे ओळखतो. यावर मला आता काहीच बोलायचं नाही.