Video : पतीकडून दिव्याचा छळ; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळं अभिनेत्री दिव्या भटनागरचं निधन झालं.   

Updated: Dec 8, 2020, 11:02 AM IST
Video : पतीकडून दिव्याचा छळ; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कोरोनाचा coronavirus संसर्ग झाल्यानंतर अखेर या व्हायरसशी झुंज देत असतानाच टेलिव्हिजन अभिनेत्री Divya Bhatnagar दिव्या भटनागरनं अखेरचा श्वास घेतला. अतिशय कमी वयात दिव्याचं असं अचानक निघून जाणं अनेकांनाच धक्का देऊन गेलं. एकिकडे दिव्याच्या निधनाचा धक्का पचलेला नसतानाच आता तिच्याच खासगी जीवनाशी निगडीत अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. 

दिव्याची फार चांगली मैत्रीण आणि टेलिव्हिजन अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी Devoleena Bhattacharjee हिनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत दिव्याच्या पतीवर काही गंभीर आरोप केले आहेत. अतिशय संतप्त स्वरांत देवोलिनानं दिव्याच्या पतीला पुन्हा एकदा कारावासात पाठवण्याची धमकी देत त्याच्यावर दिव्याला मारहाण आणि तिचा छळ करण्याचे आरोप केले आहेत. 

गगन गब्रू असं नाव घेत देवोलिनानं याच व्यक्तीमुळ दिव्या तिच्यापासून जवळपास चार वर्षे दूर राहिल्याचा खुलासा केला. दिव्याच्या पतीबाबतची गुन्हेगारी विश्वाची पार्श्वभूमीपण तिनं यावेळी सर्वांसमोर आणली. 

दिव्याच्या खासगी जीवनात तिचा इतका छळ करण्यात आला की पतीकडून होणाऱ्या या छळामुळं तिला आजारपणाचाही सामना करावा लागला. आपली मैत्रीण केवळ कोरोनामुळंच नव्हे तर, आमखीही काही कारणांमुळं जीवनाशी झगडत होती असं म्हणताना देवोलिनाच्या अश्रूंचा बांध फुटला.