....हे कपडेपण काढ; Sexiest Asian Women म्हणून नावाजलेल्या अभिनेत्रीकडे अजब मागणी

बटण उघडं असलेली जीन्स घातली आणि..    

Updated: Aug 12, 2021, 05:26 PM IST
....हे कपडेपण काढ; Sexiest Asian Women म्हणून नावाजलेल्या अभिनेत्रीकडे अजब मागणी
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई :  जमाई राजा (Jamai Raja), नागिन (Naagin), एक हजारों मे मेरी बहना है अशा मालिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री निया शर्मा (nia sharma )फार कमी वेळात प्रसिद्धीझोतात आली. मॉडेलिंग क्षेत्रातही तिनं बरंच नाव कमवलं.  Sexiest Asian Women म्हणूनही निया नावाजली गेली. तिच्या मादक सौंदर्यावर चाहत्यांच्या काळजाचा ठोका कायमच चुकला. 

निया तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून कायमच Super Hot फोटो शेअर करत असते. ज्यामध्ये तिला बोल्ड अंदाज पाहायला मिळतो. नुकतंच तिने आपले काही नवे फोटो सर्वांच्या भेटीला आणले आहेत. या फोटोला असंख्य लाईक्सही आले आहेत. पण, काही नेटकऱ्यांना मात्र नियाचा हा लूक खटकला आहे. 

उफ्फ तेरी अदा; Kangana Ranaut नं बाथटबमधला टॉपलेस फोटो शेअर करताच... 

 

गुलाबी रंगाचा ब्लेझर, सफेद रंगाची टोन्ड जीन्स, गळ्यात चोकर, हातात ब्रेसलेट आणि मादक नजर असा नियाचा एकंदर लूक या फोटोमध्ये दिसत आहे. गुलाबी रंगाचा काऊच आणि बॅकग्राऊंडची गुलाबीच असा तिचा संपूर्ण फोटो पाहिल्यानंतर ट्रोलर्सनाही जाग आली. 

नियाची टोन्ड जीन्स जरा जास्तच टोन्ड असल्यामुळे अर्थात जास्तच फाटकी असल्यामुळे आणि तिचं बटणही उघडं असल्यामुळे ट्रोलर्सनी या सौंदर्यवतीला निशाण्यावर धरलं आहे. तू आतमध्ये टॉप घालायला विसरली काय?, अरे हिनं तर सर्वांनाच मागे सोडलं, अगं बाई हे कपडेपण काढ ते तरी का घातले, अशा कमेंट करत ट्रोलर्सनी नियावर निशाणा साधला.