मुंबई : कुटुंबात आलेल्या तणावाच्या परिस्थितीविषयी काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा करणारी पलक तिवारी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी, म्हणजेच पलकने काही दिवसांपूर्वी तिच्या सावत्र पित्याविषयी एका पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली होती.
कुटुंबातील वाद आणि पोलिसांपर्यंत गेलेलं हे प्रकरण आणि त्याभोवती फिरणाऱ्या चर्चा शमण्याचं नाव घेत नाहीत, तोच पलकने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पण, यावेळी मात्र नेटकऱ्यांनी तिला पाठिंबा न देता तिची खिल्लीच उडवली आहे.
काही दिवसांपूर्वीचं प्रकरण पूर्णपणे विसरत पलकने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्या व्हिडिओमध्ये ती आपला पेहराव सर्वांनाच दाखवत आहे. पण, तिचा हा स्टायलिस्ट लूक नेटकऱ्यांचं मन मात्र जिंकू शकलेला नाही हेच खरं.
पलकने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर कोणी तिच्या तोकड्या कपड्यांवरुन खिल्ली उडवली आहे तर, कोणी तिच्या कुटुंबात झालेल्या वादावरही निशाणा साधला आहे. केवळ प्रसिद्धीझोतात येण्यासाठी कुटुंबातील वाद सर्वांसमोर आणल्याची प्रतिक्रियाही काही युजर्सनी केली आहे. त्यामुळे पलकला हा व्हिडिओ शेअर करण महागात पडलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही.