Anil Kapoor and Anand Ahuja: बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांचा फीटनेस पाहून आपल्याही मनात असं येतं की आपणही त्यांच्यासारखा फीटनेस ठेवावा. त्यातून वयाची साठी पार केलेले अभिनेते-अभिनेत्रीही इतके ग्लॅमरस आणि हॉट दिसतात. त्यांच्या या फीटनेसची सोशल मीडियावरही तूफान चर्चा रंगलेली असते. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे अनिल कपूर यांची. 'थॅंक्यू फॉर कमिंग' हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाची विशेष चर्चा आहे. सध्या चित्रपटाचे प्रमोशनही फार जोरात करण्यात आलं आहे. त्यातून या चित्रपटाचीही जोरात चर्चा रंगलेली आहे. नुकतेच या चित्रपटाचे स्क्रिनींगही करण्यात आले होते. त्यावेळी या चित्रपटाची संपुर्ण टीम हजर होती. यावेळी अनिल कपूर आणि त्यांचा जावई आनंद अहुजा यांच्याकडेच सगळ्यांचे लक्ष वेधले होते. आनंद हा अनिल कपूर यांच्या फीटनेससमोर संपुर्णपणे फिका पडलेला होता.
यावेळी नेटकऱ्यांनीही यांच्याबद्दल तूफान चर्चा केल्या आहेत. त्यामुळे 'थॅंक्यू फॉर कमिंग' या चित्रपटातून फारच तगडी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. हा चित्रपटही सर्वत्र चर्चेत असण्यामागील कारण म्हणजे या चित्रपटाचा विषय. सध्या या चित्रपटाच्या विषयानं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हा चित्रपट फॅमिली ड्रामा किंवा रिलेशनशिपवर असला तरीसुद्धा या चित्रपटाची कथा ही फारच बोल्ड आहे अशी टीकाही या चित्रपटावर होताना दिसते आहे.
परंतु या कलाकारांचे म्हणणे मात्र या विरोधात असून या चित्रपटाचा विषय अगदी सकारात्मक आणि खरा आहे, असं या चित्रपटातले कलाकार म्हणतायत. त्यातून सध्या या काही दिवसांपुर्वी या चित्रपटाच्या विषयाचे समर्थन करत आणि आपल्या लेकींनी केलेल्या या चित्रपटाच्या निर्मितीच्या बाजूने ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेते अनिल कपूर यांनीही एक प्रमोशनल व्हिडीओ हा शेअर केला होता.
हेही वाचा : ...तर फोटोतला 'हा' चिमुरडा आज हेमा मालिनी यांचा पती असता
सध्या त्या दोघांचीही तुलना नेटकरी करू लागले आहेत. अनिल कपूर यांनी आपल्या वयाची 60 पार केलेली आहे. त्यातून ते आता आजोबाही आहेत. परंतु त्यांचा फिटनेस हा एखाद्या 25 तल्या तरूणालाही लाजवेल असा आहे. इन्टाग्रामवरही ते प्रचंड सक्रिय असतात. सोबतच त्यांच्या अभिनयाचीही जोरात चर्चा रंगलेली असते. या वयातही ते त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात. ओटीटीवरही ते प्रचंड सक्रिय आहेत. त्याच्या वेबसिरिजही प्रचंड गाजतात. 'थॅंक्यू फॉर कमिंग' या चित्रपटाचीही त्यांनी निर्मिती केली आहे. सोबतच शोभा कपूर, एकता कपूर, रिया कपूर यांनीही या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यावेळी आनंद अहूजाला पाहून नेटकऱ्यांनी त्याची आणि अनिल कपूर यांची तुलना केली आहे. आपल्या जावयापेक्षाही ते फारच फीट आहेत असं काही जणं म्हणताना दिसत आहेत.
सोनमच्या उंचीपुढे त्याचीही उंची फारच कमी वाटतं. त्यामुळे त्यावरूनही त्याला ट्रोल करण्यात आलं आहे. यावेळी काहींनी म्हटलंय की, हे दोघं तर टॉम आणि जेरी आहेत. तर एकानं म्हटलंय आनंदही हिल्स द्या. तर दुसऱ्या एकानं म्हटलंय की, 'मिसमॅच'.
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.