... म्हणून दीपिका विकत आहे स्वत:चे कपडे

अनेक मुली दीपिकाच्या फॅशन सेन्सला फॉलो करतात. 

Updated: Oct 12, 2019, 01:02 PM IST
... म्हणून दीपिका विकत आहे स्वत:चे कपडे title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पादुकोन सध्या चांगलीच चर्चेत आहे. ती तिचे कपडे विकत असल्याच्या चर्चा सध्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत. अनेक मुली दीपिकाच्या फॅशन सेन्सला फॉलो करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधीच आहे. दीपिका तिच्या आवडतीचे कपडे विकत आहे. एका वेबसाइटच्या माध्यमातून तुम्हाला तिचे कपडे विकत घेता येणार आहेत. 

दीपिकाने ही घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. दीपिकाचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. १० ऑक्टोबर रोजी मानसीक रूग्ण दिवसाच्या निमित्ताने तिने ही घोषणा केली आहे. शिवाय सोशल मीडियावर कपडे विकून येणारे सर्व पैसे ती मानसिक रूग्णांच्या उपचारासाठी खर्च करणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#Repost @deepikapadukone  To each and every one of you, This #WorldMentalHealthDay I am delighted to announce the launch of The Deepika Padukone Closetwhere you can shop and own some of my most favourite pieces from my wardrobe! Visit DeepikaPadukone.com/closet ,shop till you drop and don't forget to share a picture of yourself with your purchases and tag #TheDeepikaPadukoneClosetLots of Love, Deepika #TheDeepikaPadukoneCloset #DeepikasCloset @tlllfoundation

 

ती 'लिव्ह लव्ह लाफ' या संस्थेसाठी काम करत आहे. दीपिका नेहमी मानसिक आरोग्यावर भाष्य करत असते. त्याचप्रमाणे ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. 

दीपिका लग्नानंतर पहिल्यादांच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'छपाक' चित्रपटाच्या माध्यमातून ती अॅसिड पीडित मुलीच्या कथेला न्याय देणार आहे. त्याचप्रमाणे ती अभिनेता रणवीर सिंगच्या '८३' चित्रपटामध्ये त्याच्या ऑनस्क्रिन पत्नीची भूमिका साकारआर आहे.