मुंबई : सोनी टीव्हीवर प्रसारित होणारी मालिका 'पहरेदार पिया की' हिच्यावर गदा येण्याची दाट शक्यता आहे. प्रेक्षकांच्या मागणीनुसार ही मालिका बंद होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.
सूचना आणि प्रसारण मंत्री स्मृती ईराणी यांनी या मालिकेला ब्रॉडकास्टिंग कंटेंट कम्प्लेंट्स (बीसीसीस) कडे पुढे पाठवले आहे. कारण प्रेक्षकांचा एक वर्ग आहे ज्यांना या मालिकेची कथा पटलेली नाही. त्यामुळे त्यांनी या मालिकेविरोधात ऑनलाइन याचिका दाखल केली होती. या मालिकेत १० वर्षाच्या मुलाला तिचा पिया म्हणजे बॉयफ्रेंड दाखवंल आहे. तर १८ वर्षाच्या मुलीला त्याची पहरेदारच्या भूमिकेत दाखवण्यात आलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे या मालिकेत १० वर्षाच्या मुलाचा त्या १८ वर्षाच्या मुलीशी विवाह लावू दिला.
सोशल मीडिया आणि मीडियाकडून होणाऱ्या विरोधांमुळे ही मालिका चर्चेत राहिली आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेत मधुचंद्राची रात्र दाखवण्याचा सीन शूट करण्यात आला. आणि या सीनमध्ये १० वर्षाचा मुलगा आणि १८ वर्षाची मुलगी यांच्यात हनीमूनचा सीन दाखवण्यात आला. आणि या सीनने एकच गोंधळ निर्माण झाला. अनेक प्रेक्षकांनी या सीनवर आक्षेप नोंदवला. आणि त्यानंतर अशी माहिती समोर आली की आता या हनीमूनच्या सीनचा सिक्वल शूट करणार आहेत. आणि हे ऐकून साऱ्यांचाच पारा चढला आणि त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला.
स्मृती ईराणी यांना पाठवण्यात आलेल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे की, 'पहरेदार पिया की' या मालिकेत १० वर्षाचा मुलगा आपल्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या मुलीचा पाठलाग करतो. आणि तो त्या मुलीच्या कपाळावर सिंदुर भरताना दाखवला आहे. ही मालिका रात्री ८.३० वाजता सोनी टीव्हीवर दाखवण्यात येते. आणि हा फॅमिली टाईम असल्यामुळे प्रेक्षकांचा विरोध आहे. या मालिकेमुळे प्रेक्षकांची मानसिकता बदलत आहे. आम्हाला नाही वाटतं की, आमच्या मुलांनी ही मालिका बघावी आणि त्यांच्या मनावर चुकीचे संस्कार व्हावेत. यासाठी मालिका बंद करण्यासाठी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे.