Oscars 2023 Nomination : विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या सिनेमावरुन देशातलं राजकारणही तापलं आहे. काहीजणांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. तर काही जणांनी हा प्रत्येकाने पाहावा असं आवाहन केलं आहे. काश्मिरी पंडितां (Kashmiri Pandit) वर आधारित असणाऱ्या या सिनेमाने बॉक्सिऑफिस (Box Office) वर चांगलाच धुमाकूळ घातला. मात्र या सिनेमाच्या दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी सोशल मीडियावर एक ट्विट शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे.
विवेक अग्नीहोत्री यांनी ट्विट शेअर करत सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. ट्वीट करत विवेक म्हणाले आहेत की, 2022 मध्ये आलेला द काश्मिर फाईल्स (The Kashmir Files) हा सिनेमा ऑस्कर 2023 साठी निवडला गेला आहे. याचबरोबर काश्मिर फाईल्ससोबत या यादीत अजूनही काही सिनेमांच्या नावांचा सामावेश आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी 'द काश्मीर फाइल्स' आणि इतर भारतीय चित्रपटांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांच्या चित्रपटाच्या ऑस्कर (Oscars 2023) शॉर्टलिस्टमधील काही महत्त्वाचे मुद्दे देखील शेअर केले आहेत.
रिपोर्ट्सनुसार, ऑस्करच्या या यादीमध्ये नामांकनासाठी विचारात घेतलेल्या चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. या यादीत 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files), 'कंतारा' (Kantara), 'आरआरआर' (RRR), आणि गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) सह या यादीचा भाग आहे. भारताकडून ऑफिशियल एंट्री 'Chhello Show' आहे.
The Kashmir Files Oscar साठी शॉर्टलिस्ट!
काश्मिरी पंडितांच्या जीवनाची आणि कष्टाची कथा असलेल्या 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files), ला आता जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळत आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे की 'ऑस्कर 2023' (Oscars 2023) च्या पहिल्या यादीत शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे. या यादीत आणखी काही भारतीय चित्रपटांचीही नावे आहेत. विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या चित्रपटाबद्दल ही माहिती देताना सर्व भारतीय चित्रपटांना शुभेच्छा दिल्या आहेत.
BIG ANNOUNCEMENT: #TheKashmirFiles has been shortlisted for #Oscars2023 in the first list of @TheAcademy. It’s one of the 5 films from India. I wish all of them very best. A great year for Indian cinema.
(@vivekagnihotri) January 10, 2023
विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)दिग्दर्शित 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files)चित्रपटाने देशात बंपर कमाई केली. या चित्रपटात काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार आणि त्यांना त्यांच्याच मायभूमीतून पलायन करण्यास भाग पाडण्यात आल्याचं कथानक हाताळलं गेलं.
अशा या चित्रपटाला इतर देशातही भरघोस प्रतिसाद मिळत होता, देशात 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. चित्रपटात एकतर्फी बाजू दाखवल्याचा आरोप करत, हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.