'द काश्मीर फाईल्स' आता लवकरच तुमच्या मोबाईलवर...कसं ते जाणून घ्या

2022 या वर्षात सर्वाधिक चर्चा ज्या सिनेमाची झाली तो सिनेमा म्हणजे द काश्मीर फाईल्स. हा सिनेमा आता लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. 

Updated: Apr 19, 2022, 09:50 AM IST
'द काश्मीर फाईल्स' आता लवकरच तुमच्या मोबाईलवर...कसं ते जाणून घ्या title=

मुंबईः 2022 या वर्षात सर्वाधिक चर्चा ज्या सिनेमाची झाली तो सिनेमा म्हणजे 'द काश्मीर फाईल्स'. काश्मिरी पंडितांचं हत्याकांड या सिनेमातून दाखवण्यात आलं आहे.

हा सिनेमा आता लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. त्यामुळे ओटीटीवर रिलीज होण्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही मोठी गूड न्यूजच म्हणावी लागेल.

काश्मिरी पंडितांचं हत्याकांडाचं धगधगतं वास्तव दाखवणारा सिनेमा म्हणजे 'द काश्मीर फाईल्स'. यंदाच्या वर्षात या सिनेमाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने बक्कळ कमाई केली. जगभरात या सिनेमाने जवळपास 350 कोटींचा गल्ला केला आहे. अजूनही अनेक ठिकाणी या सिनेमाची कमाई सुरूच आहे.

मात्र अनेक जण हा सिनेमा ओटीटीवर कधी येणार या प्रतिक्षेत होते. सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावरून हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करणार असल्याची घोषणा केली आहे.

द काश्मीर फाईल्स हा सिनेमा आता झी 5 वर रिलीज होणार आहे. मात्र सिनेमा कधी रिलीज होणार हे अद्याप ठरलेलं नाही. सूत्रांच्या माहितीनुसार मे महिन्यात हा सिनेमा झी 5 वर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

झी 5 नेटवर्कने या सिनेमाचे राईट्स खरेदी केल्याची माहिती मिळत आहे.

 
 
 
 

 

 
इतर 4 भाषांमध्येही रिलीज होणार सिनेमा

द काश्मीर फाईल्स या सिनेमा मिळालेला चांगला प्रतिसाद पाहून हा सिनेमा इतर भाषांमध्येही प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार हा सिनेमा कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम भाषेत रिलीज होण्याची शक्यता आहे.