प्रिया पाठोपाठ नेहा कक्करचा 'हा' व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिक नेहा कक्करचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Mar 12, 2018, 12:55 PM IST
प्रिया पाठोपाठ नेहा कक्करचा 'हा' व्हिडिओ होतोय व्हायरल  title=

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिक नेहा कक्करचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल. 

प्रिया वारिअरपाठोपाठ नेहा कक्कर सध्या चर्चेत आहे. नेहा कक्करने नुकताच एक इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अवघ्या काही वेळात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत नेहा कक्कर ना काही बोलत ना काही गात आहे. पण तरी देखील तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नेहा कक्कर फक्त काही इशारे करत आहे. 

काय शेअर केलं नेहा कक्करने 

इंटरनेट सेंसेशन बनलेली प्रिया वारिअर आणि तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याच व्हिडिओची नक्कल करताना नेहा कक्कर आपल्याला दिसत आहे. नेहाने स्वतः हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि अवघ्या काही तासांत या व्हिडिओला देखील अधिक पसंती मिळाली आहे. 

आपल्या आवाजामुळे अनेकांना मंत्रमुग्ध करणारी नेहा कक्कर. आता प्रिया वारिअरचा क्रेझीनेस फॉलो करताना दिसत आहे. तिने 11 मार्च रोजी हा व्हिडिओ शेअर केला होता. आतापर्यंत 12 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून 7 हजारापर्यंत कमेंट केल्या आहेत.

या व्हिडिओला मिळणारी पसंती पाहता प्रिया वारिअरचा क्रेझीनेस इतर सेलिब्रिटीमध्ये दिसतोय.