रोहित सराफच्या 'इश्क विश्क रिबाउंड'चं टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

टीझर रिलीज झाल्यापासून गाण्याच्या झलकने रोहितच्या चाहत्यांमध्ये आणि संगीत रसिकांमध्ये जोरदार चर्चा निर्माण झाली होती. 

Updated: May 21, 2024, 04:06 PM IST
रोहित सराफच्या 'इश्क विश्क रिबाउंड'चं टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : शाहिद कपूरच्या 'इश्क विश्क' या चित्रपटाचा सिक्वेल बनवणार आहे. ज्याला इश्क विश्क रिबाउंड असं नाव देण्यात आले आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती. रोहित सराफचे चाहते 'इश्क विश्क रिबाउंड'मध्ये त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असताना आता 'इश्क विश्क प्यार व्यार' या चित्रपटाचं टायटल ट्रॅक त्याने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. शाहिद कपूर-स्टार 'इश्क विश्क'मधील OG ट्रॅकमध्ये गोड निरागसता आणि अप्रतिम डान्स मूव्हसोबत रोहित सराफ त्याच्या चॉकलेट बॉय चार्मने पडद्यावर राज्य करणार आहे. पश्मिना रोशन, जिब्रान खान आणि नाइला ग्रेवाल यांच्यासह अभिनेता त्याची ऑन-स्क्रीन उपस्थिती यातून दाखवणार आहे.

टीझर रिलीज झाल्यापासून गाण्याच्या झलकने रोहितच्या चाहत्यांमध्ये आणि संगीत रसिकांमध्ये जोरदार चर्चा निर्माण झाली होती. चाहत्यांना खात्री आहे की हा चित्रपट अभिनेत्याला बॉलिवूडचा पुढचा रोमँटिक हिरो म्हणून स्थापित करेल. टायटल ट्रॅक चाहत्यांना नॉस्टॅल्जिक ट्रिपवर घेऊन जाणार आहे.'इश्क विश्क प्यार व्यार' हे गाणं कमालीचं सुंदर आहे यात काहीच शंका नाही.  2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या OG ट्रॅकला ट्विस्ट दिला आहे. निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित आणि रिलीज होण्याच्या तयारीत असलेल्या या चित्रपटाकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

21 जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त रोहित 'मिसमॅच 3' मध्ये ऋषी शेखावत यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तो सध्या त्याच्या शशांक खेतान-दिग्दर्शित 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' साठी शूटिंग करत आहे, ज्यामध्ये वरुण धवन, जान्हवी कपूर आणि सान्या मल्होत्रा ​​देखील दिसणार आहेत.रोहित सराफ, पश्मिना रोशन, जिब्रान खान आणि नायला ग्रेवाल स्टारर 'इश्क विश्क रिबाउंड' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. टीझरमध्ये आधुनिक प्रेमाची झलक ट्विस्टसह देण्यात आली आहे.हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहिद कपूर आणि अमृता राव स्टारर सुपरहिट चित्रपट 'इश्क विश्क' चा सिक्वेल आहे.