Sushmita Sen: काहीच दिवसांपुर्वी अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या अफेएर्सच्या तूफान चर्चा चालू झाल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणावर नाना तऱ्हेच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमातून उमटल्या होत्या. सुष्मिता सेन ही golden digger आहे. तिला पैशांची हौस आहे अश्या नानाप्रकारच्या सुष्मितावर टीका करणाऱ्या कमेंट्स होऊ लागल्या. एकीकडे ललित मोदीने स्वतःहून खुलासा करत आपण सुष्मिताला डेट करत असल्याचे म्हटले होते. तेव्हा तिला ललित मोदीने better half असेही संबोधले होते. त्यामुळे या अशा कॅप्शनमुळे चर्चांना उधाण आले होते.
त्यावर सुष्मिताने आपली प्रतिक्रिया दिली होती ज्यात तिने म्हटले होते ती अद्यापतरी कुठल्या विवाहबंधनात अडकली नसून सध्या ती सिंगल आहे आणि आपल्या दोेन मुलींसह सुखाने राहते आहे. ललित मोदी आणि सुष्मिताच्या रिलेशनशिपवरून अनेकांनी मीम्सही बनवले आणि त्या दोघांनी ट्रोलही केले होते. सुष्मिताच्या आधीच्या प्रियकरांनाही यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. तसेच बॉलीवूडमधूनही अनेकांकडून सुष्मिताला सपोर्ट मिळाला होता.
सध्याही सुष्मिता आणि ललित मोदीचीच चर्चा आहे. खरंतर या दोघांच्या रिलेशनशिप जेवढा गाजावाजा झाला नाही तेवढा त्यांच्या रिलेशनशिपवरून उठलेल्या प्रतिक्रियांवरुनच जास्त गदारोळ झाला. या बातमीनंतर सुष्मिताला खूप ट्रोल करण्यात आले. तिला golden digger म्हणून हिणवण्यात आले, त्यावरून तिची बाजू घेणारे तिचे अनेक समर्थकही पुढे आले.
नुकत्याच एका मुलाखतीतूनही बॉलीवूडच्या अशाच आघाडीच्या अभिनेत्रींनी सुष्मिताला सपोर्ट केला आहे. अभिनेत्री पुजा बेदी आणि अभिनेत्री सोेमी अली या दोघींनी सुष्मिताच्या बाजूने प्रतिक्रिया दिली आहे. सोमी अलीने सांगितले की,''मी तिला अगदी आधीपासून ओळखते. फार पुर्वीपासून आमचे फार चांगले संबंध आहेत. तिने आजतायत जे काही मिळवले आहे ते एकटीने मिळवले आहे त्यात कोणाचाच काही संबंध नाही. आर्थिकदृष्ट्याही ती स्वतःहून गंभीरपणे वर आली आहे आणि एकटीने ती तिच्या मुलींचा सांभाळही करते. ''
यावरच पुजा बेदी म्हणाली की, ''अशाप्रकारे कोणावर शितोंडे उडवणं हे फारच चुकीचे आहे कारण सुष्मिता ही खूप मेहनती स्त्री आहे. तिचा प्रवास हा फारच प्रेरणा देणारा आहे. ''