करोडोंची कमाई करूनही 'हे' चित्रपट ठरले फ्लॉप, जाणून घ्या चित्रपटांची यादी

 बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपाट बनत असतात. या चित्रपटातील काही चित्रपट चालतात, तर काही पडतात. 

Updated: Jun 30, 2022, 04:58 PM IST
करोडोंची कमाई करूनही 'हे' चित्रपट ठरले फ्लॉप, जाणून घ्या चित्रपटांची यादी title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपाट बनत असतात. या चित्रपटातील काही चित्रपट चालतात, तर काही पडतात. मात्र काही असेही चित्रपट आहे जे चित्रपटाच्या ओपनिंग डेला करोडोंची कमाई करून गेले तरीही सु्द्धा फ्लॉप ठरले होते. हे चित्रपट कोणते आहेत ते जाणून घेऊयात.  

त्रिमूर्ती (१९९५)
22 डिसेंबर 1995 रोजी अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि शाहरुख खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'त्रिमूर्ती' चित्रपट प्रदर्शित झाला होता. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 1.6 कोटींची कमाई केली होती. ओपनिंग डे वर 1 कोटींचा टप्पा पार करणारा त्रिमूर्ती हा पहिला भारतीय चित्रपट होता. मात्र, नंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि चित्रपट फ्लॉप झाला. त्यावेळी हा चित्रपट 11 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर 13 कोटींचा गल्ला जमवला होता.

रिफ्यूजी (2000)
अभिषेक बच्चन आणि करीना कपूर यांचा पहिला चित्रपट 'रेफ्युजी' 2000 साली प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शक जेपी दत्ता चित्रपटाने पहिल्याच दिवशी दीड कोटींची कमाई केली आहे. पण या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर फार काळ टिकली नाही आणि हा चित्रपटही फ्लॉप झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 35 कोटींची कमाई केली होती.

'मंगल पांडे' (2005) 
आमिर खान, अमिषा पटेल आणि राणी मुखर्जी स्टारर चित्रपट 'मंगल पांडे' 2005 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे बजेट जवळपास 34 कोटी होते. पहिल्या दिवशी आमिरच्या चित्रपटाने 3.24 कोटींचे कलेक्शन केले. पण काही दिवसांनी चित्रपटाची जादू ओसरू लागली. या चित्रपटाने केवळ 28 कोटींचाच व्यवसाय केला.

ठग्स ऑफ हिंदोस्तान (2018)
अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, आमिर खान आणि फातिमा सना शेख यांसारख्या स्टार्सनी सजलेला 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 50 कोटींची कमाई केली होती. पण तरीही हा चित्रपट फ्लॉप ठरला. चित्रपटाचे बजेट 300 कोटी होते, ज्याने 320 कोटी जमा केले.