फक्त रणबीर-आलियाच नाही तर या जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला

या जोड्यांचा समावेश 

फक्त रणबीर-आलियाच नाही तर या जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण ही जोडी 2018 मधील पडद्यावरील आणि पडद्यामागील ठरली आहे. आता 2019 मध्ये नवीन जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. फक्त फरक इतकाच असणार की, ही जोड्या रिअल नसून रील लाईफमधील असणार आहेत. 

महत्वाची बाब म्हणजे सिल्वर स्क्रीनवर या जोड्या पहिल्यांदा दिसणार आहेत. बघूया कोण कोण आहेत या जोड्यांमध्ये... 

रणवीर सिंह - आलिया भट्ट (गली बॉय) 

2019 मधली सर्वात धमाकेदार जोडी 'गली बॉय' या सिनेमाच्या माध्यमातून ही जोडी भेटायला येणार आहे. या सिनेमाचा पहिला लूक  समोर आलं आहे. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट एकत्र दिसणार आहे. या सिनेमाला जोया अख्तर दिग्दर्शित करत असून व्हॅलेंटाईन डेच्या पुढच्या दिवशी 15 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ही गोष्ट स्ट्रीट रॅपर विवियन फर्नांडिस उर्फ डिवाइन आणि नावेद शेख उर्फ नेजी यांच्या जीवनावर आधारित आहे.  

कार्तिक आर्यन - कृति सेनन (लुक्काछिपी) 

2018 मध्ये 'सोनू के टीटू की स्वीटी' या सिनेमाने 100 कोटीचा गल्ला करणारा सिनेमा ठरला आहे. कार्तिक आर्यनची जोडी 2019 मध्ये नव्या अभिनेत्रीसोबत दिसणार आहे. 1 मार्चला 'लुक्काछिपी' सिनेमा प्रदर्शित होत आहे. ही गोष्ट मथुराची असून कार्तिक आर्यन यामध्ये एका टीव्ही रिपोर्टर एका मुलीच्या प्रेमात पडतो. या सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. 

सोनम कपूर - दुलकीर सलमान (द जोया फॅक्टर) 

यावर्षी सोनम कपूर साऊथचा हिट अभिनेता दुलकीर सलमानसोबत 'द जोया फॅक्टर'मध्ये दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक शर्मा करणार असून ही गोष्ट अनुजा चौहान यांच्या पुस्तकावर हा सिनेमा आहे. 5 एप्रिल रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. 

टायगर श्रॉफ - अनन्या पांडे (स्टुंडट ऑफ द ईअर 2) 

2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या स्टुडंट ऑफ द ईअर या सिनेमाचा सिक्वल असणार आहे. या सिनेमात टायगर श्रॉफ आणि लोकप्रिय अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे दिसणार आहे. 10 मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार असून पुनीत मल्होत्रा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. 

शाहिद कपूर - किआरा आडवाणी (कबीर सिंह) 

चार वर्षाअगोदर डेब्यू करणारी अभिनेत्री किआरा आडवाणीने 2018 मध्ये नेटफ्लिक्सवरील ओरीजनल-लस्ट स्टोरीजमधून खूप कौतुक मिळवलं होतं. आता किआरा शाहिदसोबत दिसणार आहे. हा सिनेमा 'अर्जुन रेड्डी' चा रिमेक असून 'कबीर सिंह' असं या सिनेमाचं नाव आहे. हा सिनेमा 21 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.