स्टार किडमुळं चित्रपटातून बाहेर काढले; आता मालिकेत काम करते 'ही' अभिनेत्री

Erica Fernandes Career Life: छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीने कधी काळी मोठा पडदा गाजवला होता. मात्र, त्यानंतर तिने टीव्हीमध्ये काम करणे सोयीस्कर ठरवले.  

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 24, 2024, 03:44 PM IST
 स्टार किडमुळं चित्रपटातून बाहेर काढले; आता मालिकेत काम करते 'ही' अभिनेत्री title=
these tv actress career struggle was replaced in films by star kids

Erica Fernandes Career Life: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री एरिका फर्नांडिस तिचा अभिनय आणि फोटोशूटमुळं कायम चर्चेत असते. पण तुम्हाला माहितीये का एरिकाने तिच्या करिअरची सुरुवात चित्रपटातून केली होती. मात्र नंतर अशा काही घटना घडल्या की तिला टीव्ही इंडस्ट्रीकडे वळावे लागले. नेमकं काय घडलं हे जाणून घेऊया. 

एरिका फर्नांडिसने साउथच्या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. मात्र, आता तिने टिव्ही इंडस्ट्रीमध्ये खूप लोकप्रियता मिळवली आहे. मात्र, एरिकाला मनोरंजन क्षेत्रात नाव कमवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली होती. एका वृत्तवाहिनीशी बोलताना तिने याबाबत खुलासा केला आहे. एक वेळ अशी होती जेव्हा मी साउथच्या चित्रपटात काम करत होती. मी तेव्हा 2-3 दिवस शूट केले. मात्र, मला नंतर मीडियाच्या माध्यमातून कळले की मला रिप्लेस करण्यात आलं आहे. अशीही एक वेळ आली जेव्हा मी ऑडिशनसाठी गेले आणि जवळपास माझी निवड झालीच होती. मात्र, त्यानंतर एका स्टार किडमुळं मला रिप्लेस करण्यात आले. नेपोटिज्म झालं होतं, असं ऐरिकाने म्हटलं आहे. 

जेव्हा मी चित्रपट सोडून टीव्ही क्षेत्रात येण्याचं ठरवलं तेव्हा लोकं मला विचारत होते की मी टिव्हीवर काम करण्यास कशी तयार झाली. पण मला याचा काहीच फरक पडत नाही. कारण माझ्यासाठी काम महत्त्वाचं आहे. आणि मी हे गर्वाने सांगू शकते मी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर काम केले तरी तिथे उत्तमच काम करेन, असंह एरिका म्हणते. 

एरिकाने 2013 मध्ये तामिळ चित्रपट Ainthu Ainthu Ainthu ने चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल ठेवले होते. त्यानंतर तिने साउथ चित्रपटात 2013 ते 2017 पर्यंत काम केले होते. तिने आत्तापर्यंत Ninnindale, बबलू हैप्पी है, Virattu, Galipatam या चित्रपटात काम केले आहे. 2023मध्ये तिने शॉर्ट फिल्म द हंटिगमध्येही काम केले होते. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Erica J Fernandes (@iam_ejf)

एरिकाच्या टिव्ही क्षेत्रातील कामाबद्दल बोलायचे झाल्यास, 2016 मध्ये कुछ रंग प्यार के ऐसे भी या सिरीयलमध्ये तिने पहिल्यांदा भूमिका साकारली होती. या सिरीअलने तिला वेगळी ओळख निर्माण करुन दिली. या सिरीअलमध्ये तिने डॉ. सोनाक्षी बोस ही भूमिका साकारली होती. या सिरीअलमुळं तिला घराघरात ओळख मिळाली. 2018 मध्ये तिने एकता कपूरच्या कसौटी जिंदगी या सिरिअलमध्ये काम केले. या शोमुळं तिच्या करिअरला चार चाँद लागले. तिने ओटीटी वर्ल्डमध्येदेखील काम केले आहे. लव अधूरामध्ये तिने काम केले होते.