close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'बागी 3'मध्ये या अभिनेत्रीची वर्णी?

 59 कोटी रुपयांचा बजेट असलेला 'बागी 2' सिनेमा 2018 मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता.   

Updated: Feb 12, 2019, 01:13 PM IST
'बागी 3'मध्ये या अभिनेत्रीची वर्णी?

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या 'बागी 3' मध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका कोण साकारणार? याचं उत्तर आता मिळालंय. 'बागी 3' मध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरची वर्णी लागली आहे. ट्रेड ऍनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर पोस्ट करत 'बागी 3' सिनेमाच्या अभिनेत्रीच्या नावाची अधिकृत घोषणा केलीय. 'बागी 2' सिनेमात मुख्य भूमिकेत टायगर आणि दिशा पाटनी झळकले होते. 59 कोटी रुपयांचा बजेट असलेला 'बागी 2' सिनेमा 2018 मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता.   

 

'बागी 3' सिनेमासाठी दिशा पाटनी आणि सारा अली खान यांचे नावदेखील सुचवण्यात आले होते. पण बागी सिनेमाच्या पहिल्या भागात प्रेक्षकांनी श्रद्धाच्या अभिनय अणि स्टंटची मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली होती. बागी सिनेमासाठी श्रद्धाने मार्शल आर्टचे प्रशिक्षणही घेतले होते. म्हणून 'बागी 3' मध्ये श्रद्धाची निवड करण्यात आल्याचे निर्मात्यांनी सांगितले. 

'श्रद्धाच्या येण्याने 'बागी 3' सिनेमाची टीम पूर्ण झाली आहे. बागी सिनेमात टायगर आणि श्रद्धाच्या जोडीला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले, मला विश्वास आहे टायगर - श्रद्धा 'बागी 3' सिनेमाला योग्य न्याय देतील' असं सिनेमाचा निर्माता साजिद नाडियादवाला यांनी म्हटलंय. सिनेमाचे दिग्दर्शन अहमद खान करणार असून निर्मिती आणि कथालेखन साजिद नाडियादवाला करणार आहेत. सिनेमा मार्च 2020 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.