Mahira Khan : बॉलिवूडमध्ये आल्यावर अनेकांचं नशीब बदलते. या विश्वानं अनेकांना एक वेगळी ओळखही मिळवून दिली आहे. असे अनेक सुपरस्टार्सही आहेत ज्यांनीही नव्या कलाकारांंना अथवा फ्लॉप कलारांना नवी ओळख मिळवून दिली आहे. सध्या अशाच एका अभिनेत्रीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. जी अभिनेत्री एकेकाळी कचरा आणि लादी पुसण्याचे काम करायची जिला शाहरूख खाननं नवसंजीवनी दिली आणि त्यानंतर तिला चांगलीच ओळख मिळाली आहे. सध्या या अभिनेत्रीची बरीच चर्चा आहे. काही दिवसांपुर्वी तिच्या लग्नाची बरीच चर्चा रंगलेली होती. तिच्या लग्नाचे फोटोही व्हायरल झाले होते. ही पाकिस्तानी अभिनेत्री आहे. आज तिच्याकडे करोंडोची संपती आहे. बंगला, गाडी, पैसा आणि सर्वकाही आहे परंतु तिच्या आयुष्यात असाही एक काळ होता जेव्हा तिच्याकडे काम नव्हते. शाहरूख खानच्या रईस चित्रपटानंतर तर तिची चांदीच झाली होती.
तिचा हा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. यात तिला ओळखणंही कदाचित तुम्हाला कठीण जाईल. मध्यंतरी तिचा आणि रणबीर कपूरचा एक फोटो व्हायरल झाला होता ज्यात ते दोघं सिगारेट ओढताना दिसत होते. या अभिनेत्रीचं नावं आहे महिरा खान. समोर आलेल्या माहितीनुसार, तिचं शिक्षण कॅलिफॉर्नियामध्ये झालं होतं. तिकडे आपला खर्च भागवण्यासाठी तिनं रेस्टोरंटमध्ये जॉब केला आणि सोबतच तिनं कचराही काढला आणि लादीही पुसली होती. तिनं तिथे कॅशियरचेही काम केले होते. आज तिच्याकडे सगळं वैभव आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, तिचं नेटवर्थ हे 170 कोटी रूपये इतकं आहे. शाहरूख खानसोबत 'रईस' हा सिनेमा 2016 साली तिनं केला होता. तेव्हा तिला बरीच लोकप्रियताही मिळाली होती.
हेही वाचा : मुलगा झाल्याची गुडन्यूज कळताच शेफाली शहानं नर्सकडे केली अजब मागणी; म्हणाली...
तिच्याकडे अनेक महागड्या गाड्याही आहेत. तिच्या बरंच मोठं कार्सचं कलेक्शन आहे. तिच्या महागड्या आणि जबरदस्त लक्झरीच्या कार्स आहेत. त्याचसोबत महागड्या बंगल्याचीही ती मालकीण आहे. काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर तिच्याविषयीच्या चर्चांना उधाण आलं होतं. जेव्हा तिच्या लग्नाचे फोटोही बरेच व्हायरल झाले होते.
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत. ज्यांना सुपरहीट चित्रपट करूनही हवी तशी लोकप्रियता मिळालेली नाही. त्यातून त्यांचे नशीब हे ओटीटवरून चांगलेच बदलले आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. आता ते पुर्णत: ओटीटीवरील स्टार झाले आहेत.
|
CSK
(20 ov) 250/3
|
VS |
RCB
207(19.4 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Chennai Super Kings by 43 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 250/3
|
VS |
CSK
207(19.4 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Chennai Super Kings by 43 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SRH
(20 ov) 156/9
|
VS |
LSG
160/5(19.5 ov)
|
| Lucknow Super Giants beat Sunrisers Hyderabad by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.