'डॉन 3'मध्ये 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची वर्णी; रणवीरसोबत करणार स्क्रिन शेअर

'डॉन 3'मध्ये मुख्य अभिनेता म्हणून रणवीर सिंगचं नाव समोर आलं आहे.  या सिनेमात शाहरुख ऐवजी रणवीर सिंह दिसणार असल्याच्या बातमीवरही शिक्कामोर्तब झालं आहे.याचबरोबर, चित्रपटात रोमाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. 

सायली कौलगेकर | Updated: Aug 9, 2023, 07:50 PM IST
'डॉन 3'मध्ये 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची वर्णी; रणवीरसोबत करणार स्क्रिन शेअर  title=

मुंबई : फरहान अख्तरचा आगामी चित्रपट 'डॉन 3' गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मागील दोन चित्रपट हिट झाल्यानंतर फरहान अख्तर 'डॉन'च्या तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही बातमी आल्यापासून लोकांमध्ये उत्साहचं वातावर पाहायला मिळत आहे. आज अखेर या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे मात्र नुकताच या सिनेमात शाहरुख ऐवजी रणवीर सिंह दिसणार असल्याच्या बातमीवरही शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र, याचबरोबर अनेक दिवसांपासून या सिनेमात अभिनेत्री कोण असणार या चर्चांना उधाण आलं होतं. वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर आता डॉन 3'च्या हिरोईनसाठी सध्या अभिनेत्री कियारा अडवाणीच्या नावाची चर्चा आहे.   

'डॉन 3'मध्ये मुख्य अभिनेता म्हणून रणवीर सिंगचं नाव समोर आलं आहे. याचबरोबर, चित्रपटात रोमाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. 'डॉन ३'मध्ये कियारा अडवाणी रोमाची भूमिका साकारू शकते, असं सोशल मीडियावर बोललं जात आहे. याचं कारण म्हणजे अभिनेत्री निर्माता रितेश सिधवानीच्या ऑफिसबाहेर स्पॉट झाली. जे डॉन या सिनेमाचे निर्माते आहेत. 

कियारा अडवाणी नुकतीच रितेश सिधवानीच्या ऑफिसला भेट देताना दिसली, तेव्हापासून प्रियांका चोप्राच्या जागी रोमाच्या भूमिकेत कियारा दिसणार असल्याच्या अफवा पसरू लागल्या आहेत. फरहान अख्तरने 'डॉन 3' ची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांत कियाराला तिथे स्पॉट करण्यात आलंय.

नुकतीच कियारा  फरहान अख्तरने 'डॉन 3' पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं होतं. यावेळी या पोस्टरमध्ये कोण अभिनेता असणार हे गुपित ठेवण्यात आलं होतं. मात्र नुकतंच या नावाचा खुलासा करण्यात आला आहे. या सिनेमात रणवीर सिंह झळकणार आहे. त्याच्यासोबत खरंच या सिनेमात कियारा अडवाणी झळकेल का हे येणारा काळच ठरवेल.

 सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून चाहते 'नो एसआरके नो डॉन' ट्रेंड करत आहेत. मात्र यानंतरही चित्रपट निर्मात्याने एका नव्या अभिनेत्याला डॉन म्हणून प्रेक्षकांसमोर आणण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर फराह अख्तरने  आपल्या जारी केलेल्या निवेदनात किंग खानवर ज्याप्रमाणे प्रेमाचा वर्षाव केला त्याप्रमाणे त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्याचे आवाहन केलं. Don 3 हा 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.