आपल्या गर्लफ्रेंडच्या लग्नावेळी Arjun Kapoor कसा दिसायचा एकदा पाहाच!

अर्जून कपूर आणि मलायका अरोरा हे दोघं गेली चार वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत. 

Updated: Oct 3, 2022, 09:00 PM IST
आपल्या गर्लफ्रेंडच्या लग्नावेळी Arjun Kapoor कसा दिसायचा एकदा पाहाच!

Malaika Arora and Arbaaz Khan Wedding Arjun Kapoor Photo: मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी (Malaika Arora and Arbaaz Khan Marriage) आपला 19 वर्षांचा संसार मोडला असला तरी आजही ते चांगले मित्र आहेत. आपल्या मुलांसाठी ते कायम एकत्र येतात आणि अनेकदा ते एकत्र स्पॉटही होतात. अरबाज जॉर्जिया अन्द्रानी (Giorgia Andirani) नावाच्या एका इटालियन अभिनेत्रीला डेट करतो आहे. तर मलायका अरोरा बॉलीवूड सुपरस्टार अर्जून कपूरला (Arjun Kapoor dating  Malaika Arora) डेट करते आहे. (this is how arjun kapoor used to look like when girlfriend malaika and arbaaz got married)

अर्जून कपूर आणि मलायका अरोरा हे दोघं गेली चार वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत. असं म्हटलं गेलं आहे की सलमान खानच्या बहीणीला म्हणजेच अप्रिताला (Salman Khan Sister) अर्जून कपूर डेट करत होता. ते दोघे एका पार्टीला गेले असताना तिथं मलायकाशी अर्जूनची जवळीक वाढली. 

गेल्या चार वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात बुडालेलं हे जोडपं कधी डीनरला तर एअरपोर्टवर स्पॉट होत असतं. त्या दोघांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांनाही आनंद होत असतो. मलायकाचं लग्न झालं तेव्हा अर्जून कपूर 12-13 वर्षांचा होता. अर्जून 2003 साली कल हो ना हो (Kal Ho Na Ho) या चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शकाचं काम केलं होतं. 1998 साली मलायका आणि अरबाजचं लग्न झालं परंतु तेव्हा अर्जून कपूर कसा दिसत होता याची तुम्हाला कल्पना आहे का? 

समोर आलेल्या माहितीनुसार, अर्जून कपूर आता जसा फीट आणि हॅण्डसम दिसतो तसा नव्हता त्याचं थोडं वजन होतं आणि तो चष्मा तसेच ब्रेसेस लावायचा. अर्जून कपूरनं स्वतःला पुर्णतः बदललं आहे आता तो पुर्णतः वेगळा दिसतो. परंतु त्याचा फॅट टू फीट हा प्रवासही थक्क करणारा आहे. 

जेव्हा माझे आई-वडील वेगळे झाले, तेव्हा मी स्ट्रेसबस्टर म्हणून खूप जास्त खाऊ लागलो होतो. त्या धक्कातून सावरण्यासाठी मी त्याच आधार घेत होतो आणि एकवेळ अशी आली की मी अन्नाचं अतिसेवन करू लागलो होतो. मला तेव्हा फारच भावनिक वाटायचे, असा किस्सा अर्जून कपूरनं सांगितला होता. 

त्या काळात फास्ट फूड कल्चर वाढू लागलं होतं आणि आपण त्याच्या आहारी गेलो होतो अशीही महिती त्यानं दिली. बिर्याणी आणि आईस्क्रीमचे अतिसेवन केल्यानंतर त्याने दोन वर्षे भात आणि साखर दोन्ही सोडले होते असेही त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्याच्या ढासळत्या आरोग्यावर मात करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला. मला दमा झाला, त्यामुळे मला दुखापत झाली आणि मी 16 वर्षांचा होतो तोपर्यंत मी 150 किलोपर्यंत पोहोचलो होतो असेही अर्जुनने सांगितले.