'दबंग ३'मध्ये अशी लागली सई मांजरेकरची वर्णी

या चित्रपटातून महेश मांजरेकर यांची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे 

Updated: Dec 10, 2019, 06:17 PM IST
'दबंग ३'मध्ये अशी लागली सई मांजरेकरची वर्णी
सई मांजरेकर

मुंबई : अभिनेता  salman khan सलमान खान याचं नाव घेतलं की आपोआपच काही चित्रपटांची नावं समोर येतात. अशी नावं ज्या चित्रपटांमधील सलमानचा अफलातून अंदाज विशेष गाजला. त्याचा असाच अंदाज पाहायला मिळाला, 'दबंग' या चित्रपटातून. चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामागोमाग आता dabangg 3 'दबंग ३'सुद्धा बॉक्स ऑफिसवर धडकण्यासाठी सज्ज झाला आहे. 

भाईजान सलमानची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून एका मराठमोळ्या सेलिब्रिटीची मुलगी तिच्या कारकिर्दीची सुरुवातही करत आहे. त्यामुळे 'दबंग ३' खास आहे. ही मुलगी म्हणजे निर्माते- दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर sai manjrekar . 

'झी २४तास'शी संवाद साधताना सईने तिची या चित्रपटात कशी वर्णी लागली याचा उलगडा केला. 'दबंग चित्रपटाचा तिसरा भागही यावा यासाठीची उत्सुकता मलाही लागली होती. मी वाटच पाहात होते. अखेर गेल्या वर्षी मला कळलं की चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. मी त्यावेळी फारच आनंदात होते. तेव्हाल सलमान सरांचा मला फोन आला होता. या भूमिकेसाठी आम्ही तुझा विचार करत आहोत. तेव्हा तयारीला लाग... स्क्रीनटेस्ट वगैरे होणार आहे. पुढे या भूमिकेसाठीचा निर्णय घेण्यात येईल..... या सर्व गोष्टी घडल्या आणि अखेर मला हा चित्रपट मिळाला', असं सईने तितक्याच उत्साहाने सांगितलं. 

हा चित्रपट म्हणजे आपल्या हृदयाचाच एक भगा असल्याचं अतिशय समर्पक वक्तव्य तिने केलं. जे पाहता पदार्पणाच्या चित्रपटाशी जोडलं गेलेलं तिचं नातं लक्षात आलं. सलमानसोबत काम करणं तेही पहिल्या चित्रपटात म्हणजे जणू स्वप्न साकार होणं, अशी प्रतिक्रिया तिने दिली. प्रभुदेवा, सलमान खान, सोनाक्षी, डिंपल कपाडीया अशा कलाकारांसोबत पदार्पणाच्याच चित्रपटात काम करायला मिळणं ही अतिशय मोठी बाब असल्याचं सई म्हणाली. 

Chhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच

सईसाठी तिचा हा पहिलावहिला चित्रपट अतिशय खास असण्याचं आणखी एक कारण म्हणजे यामध्ये ती महेश मांजरेकर यांच्यासोबतही स्क्रीन शेअर करणार आहे. मुळात या भावना तर शब्दांतही व्यक्त करता येणार नाहीत अशाच आहेत, हेसुद्धा तिने सांगितलं. सईचा हा एकंदर उत्साह, पहिल्या चित्रपटासाठीची तिची उत्सुकता पाहात प्रेक्षकही तिच्या या चित्रपटासाठी तितकेच उत्सुक आहेत असं म्हणायला हरकत नाही.