'या' व्यक्तीने राखी सावंतच्या पतीला पाहून म्हटलं....

तुम्ही त्याला पाहिलं का? 

Updated: Sep 26, 2019, 02:28 PM IST
'या' व्यक्तीने राखी सावंतच्या पतीला पाहून म्हटलं....
'या' व्यक्तीने राखी सावंतच्या पतीला पाहून म्हटलं....

मुंबई : कायमच चर्चांच्या वर्तुळात वावरणाऱ्या राखी सावंतने म्हणे काही दिवसांपूर्वीत लग्न केलं. एका अतिशय श्रीमंत व्यक्तीसोबत राखी विवाहबंधनात अडकली. तिने स्वत: वधूच्या रुपातील फोटोसुद्धा पोस्ट केले होते. पण, राखीने तिच्या पतीचा फोटो मात्र अद्यापही पोस्ट केला नाही. तिने पतीसोबतचा एकही फोटो पोस्ट केलेला नाही. त्यामुळे अनेकांनीच राखीच्या या लग्नावरच प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. 

विवाहबंधनात अडकल्याचा दिखावा करत राखी हे सारंकाही प्रसिद्धीझोतात येण्यासाठी करत असल्याचे आरोपही तिच्यावर झाले. आपल्याविषयी येणाऱ्या या प्रतिक्रिया पाहत आता ड्रामा क्वीन राखीने तिच्या पतीला ज्या व्यक्तीने पाहिलं आहे, त्या व्यक्तीचाच व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

राखीने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये एक चाहता आपण तिच्या पतीला पाहिल्याचं सांगताना दिसत आहे. 'हो... मी रितेश जिजूंना पाहिलं', असं तो मुलगा म्हणताना दिसत आहे. राखीचा पती किती श्रीमंत आहे हेच तो वारंवार या व्हि़डिओमध्ये सांगत आहे. तिचं लग्न खोटं नसल्याचं म्हणत त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून राखीच्या पतीला पाहिल्याचा आनंद व्यक्त केला आहे. 

राखी सावंतने तिचं लग्न झाल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातूनच जाहीर केलं होतं. ज्यानंतर तिने आपलं वैवाहिक आयुष्य किती सुखकर आहे असं भासवण्यासाठी सातत्याने काही व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पण, यातच स्वत: राखीनेच पती आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रारही केली होती. आता व्हिडिओंच्याच बळावर चाहत्यांपर्यंत आलेलं राखीचं हे नातं नेमकं आहे तरी कसं, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे असंच म्हणावं लागेल.