महाठग सुकेशने दिली होती जॅकलिन फर्नांडिसला इतक्या किंमतीची डायमंड रिंग

जॅकलिन फर्नांडिस हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे.

Updated: Feb 25, 2022, 09:51 PM IST
महाठग सुकेशने दिली होती जॅकलिन फर्नांडिसला इतक्या किंमतीची डायमंड रिंग title=

मुंबई : जॅकलिन फर्नांडिस हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. मात्र अनेक दिवसांपासून तिच्यावर संकटाचे ढग घिरट्या घालत आहेत. त्यातील एक  म्हणजे महाठग सुकेश चंद्रशेखर. या व्यक्तीचं नाव जॅकलीनच्या नावाशी खूप दिवसांपासून जोडलं जात आहे. खरंतर ही काही दिवसांपूर्वी EDने याबाबत जॅकलिनची चौकशी केली होती. 

असं बोललं जात की, सुकेशने जॅकलिनला प्रपोज केलं. प्रपोज करताना त्याने अभिनेत्रीला करोडो रुपयांची डायमंड रिंग गिफ्ट दिली. ज्यामध्ये JआणिS स्पष्ट अक्षरात लिहिलेले आहेत. जॅकलिनची EDने चौकशी केली असता, अभिनेत्रीला कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू मिळाल्याचं आणि दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं कळले.  महाठग सुकेशने फक्त जॅकलीनलाच नाही तर इतर अनेक अभिनेत्रींनाही फसवणुक करण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये भूमी पेडणेकर, सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांचाही समावेश होता.

गृहमंत्रालयाचं नाव घेऊन सुकेशने जॅकलीनशी संपर्क साधल्याचं बोलले जात आहे. त्याचं म्हणणं तिच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने पिंकी इराणीला आपलं प्यादं  बनवलं आणि जॅकलीन आणि सुकेशचं भांडण सोडवण्यासाठी पिंकीनेच अभिनेत्रीला तिहार तुरुंगात नेलं. असंही म्हटलं जातं. यासाठी सुकेशने पिंकीला 10 कोटींची ऑफर दिली होती. सुकेशशी ओळख करून देण्यासाठी पिंकीने काही अभिनेत्रींना अनेकदा तुरुंगात नेलं होतं. जेणेकरून सुकेश त्यांना प्रभावित करू शकेल.

याआधी सुकेशने जॅकलिनचा आपल्या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आम्ही फक्त एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होतो आणि मी तिला काही महागड्या भेटवस्तू दिल्या. जॅकलिन सध्या अक्षय कुमारसोबत बच्चन पांडे या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय अनेकवेळा ती मनी लाँड्रिंग प्रकरणामुळेही चर्चेत असते.