टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीचं ब्रेकअप?

दोघांच्याही चाहत्यांना मोठा धक्का 

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीचं ब्रेकअप?

मुंबई : 'बागी 2' अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या नातं सगळ्यांनाच माहित आहे. या दोघांच 3 वर्षांपासून अफेअर होतं आणि आता अशी माहिती मिळते की, या दोघांनी आपलं नातं संपवून ब्रेकअप केलं आहे. बॉलिवूड लाइफ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी आपलं नातं थांबवलं आहे. या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण होत होती यावरून या दोघांनी आपलं नातं इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 

मीडियामध्ये या अगोदर अशी अनेकदा चर्चा झाली की, हे दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत पण या दोघांनी स्वतः कॅमेऱ्यासमोर येऊन मान्य केलं नाही. या दोघांच 3 वर्षांपासून नातं आहे आणि या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडिया साइटवर उपलब्ध आहेत. बागी 2 या सिनेमातील ही जोडी अनेकदा लंच आणि डिनर डेटवर जाताना दिसली. 

अशातच चर्चा होती की, टायगर श्रॉफ आणि स्टूडंट ऑफ द इअर 2 या सिनेमातील अभिनेत्री तारा सुतारिया यांच्यात जवळीक वाढत होती. आणि याच कारणामुळे दिशा पटानी नाराज होती. आणि हेच यांच्या ब्रेकअपचं कारण असल्याचं देखील म्हटलं जात आहे. दिशा आणि टायगर श्रॉफच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंद केलं. बागी 2 या सिनेमातही दोघांनी खूप चांगल काम केलं. बॉक्स ऑफिसवर देखील या सिनेमाने खूप चांगली कमाई केली. वर्ल्डवाइड या सिनेमाने 250 करोड रुपयांची कमाई केली आहे.