... म्हणून गर्लफ्रेंडच्या मांडीवर बसला टायगर श्रॉफ, फोटोज व्हायरल

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी थर्टी फर्स्ट तसेच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी श्रीलंकेला रवाना झाले आहेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 28, 2017, 05:31 PM IST
... म्हणून गर्लफ्रेंडच्या मांडीवर बसला टायगर श्रॉफ, फोटोज व्हायरल title=
Image: Twitter

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी थर्टी फर्स्ट तसेच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी श्रीलंकेला रवाना झाले आहेत.

टायगर-दिशा मुंबई विमातळावर एकत्र

बुधवारी रात्री टायगर आणि दिशा दोघेही मुंबई विमानतळावर पहायला मिळाले. या दोघांचे फोटोजही समोर आले आहेत. या फोटोमध्ये अभिनेता टायगर हा दिशाच्या चक्क मांडीवर बसलेला पहायला मिळत आहे.

सोबत अभिनेता रणवीर सिंहही उपस्थित

अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशासोबत रणवीर सिंहही उपस्थित होता. इलेक्ट्रिक शटलवर रणवीर सिंह याला जागा बनविण्यासाठी टायगर दिशाच्या मांडीवर बसला.

शूटिंगदरम्यान झालं प्रेम

मिळालेल्या माहितीनुसार, टायगर आणि दिशा यांचा म्युझिक व्हिडिओ 'बेफिक्रा'च्या शूटिंगदरम्यान एकमेकांसोबत प्रेम झालं. मात्र, दोघांनीही अद्याप आपलं नातं सर्वांसमोर जाहीर केलेलं नाहीये. पण, टायगरने एकदा म्हटलं होतं की, अभिनेत्री दिशासारखी त्याची गर्लफ्रेंड असावी.

टायगर आणि दिशा हे दोघेही डिनर, लंच, पार्टी तसेच इव्हेंट्समध्ये एकत्र पहायला मिळाले आहेत. दोघेही अहमद खानच्या 'बागी २' या सिनेमात पहिल्यांदा एकत्र पहायला मिळाले होते. या सिनेमात त्यांच्यासोबतच प्रतीक बब्बर आणि मनोज वाजपेयी हे सुद्धा आहेत.