"स्वतःला संपवावसं वाटत होतं, पण..."; 'तारक मेहता...'मधील आणखी एका अभिनेत्रीचे गंभीर आरोप

TMKOC Monika Bhadoriya : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधल्या मोनिका भदौरियाने दावा केला की शोच्या निर्मात्यांनी काम करताना तिचा छळ केला. त्यावेळी मनात मरण्याचा विचारही आला होता असेही मोनिका भदौरियाने म्हटलं आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 6, 2023, 11:03 AM IST
"स्वतःला संपवावसं वाटत होतं, पण..."; 'तारक मेहता...'मधील आणखी एका अभिनेत्रीचे गंभीर आरोप title=

TMKOC Monika Bhadoriya : लोकप्रिय टिव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. ज्या लोकांमुळे या मालिकेला इतकं नाव मिळालं ते आता धक्कादायक खुलासे करत आहेत. आधी शैलेश लोढा आणि नंतर जेनिफर मिस्त्री यांनी असित मोदींवर गंभीर आरोप केले. यानंतर हळूहळू आणखी सहकलाकारही याबाबत भाष्य करू लागले आहेत. टीव्ही अभिनेत्री मोनिका भदौरियाने (Monika Bhadoriya) तारक मेहता का उल्टा चष्माच्या निर्मात्यांवर नवे आरोप केले आहेत. शोमध्ये काम करताना इतका छळ झाला की आत्महत्या करावीशी वाटत होती असे मोनिका भदौरियानं म्हटलं आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये बागाच्या गर्लफ्रेंडची भूमिका मोनिका भदौरियाने निभावली होती.

जेनिफर मिस्त्रीनंतर आता या शोमध्ये बावरीची भूमिका करणारी अभिनेत्री मोनिका भदौरियाने पुन्हा एकदा निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मोनिकाने सांगितले की, सेटवर तिचा खूप छळ झाला होता. इतकंच नाही तर निर्मात्यांनी मला करारावर सही करायला भाग पाडलं जेणेकरुन माध्यमांबाबत बोलता येणार नाही. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोनिका भदौरियाने हे धक्कादायक खुलासे केले आहेत.

माझ्या आयुष्यात काहीच उरले नाही - मोनिका भदौरिया

"मी अनेक कौटुंबिक संकटातून जात होतो. मी माझी आई गमावली, मी माझी आजी गमावली आणि हे सर्व काही काही अंतरानेच घडले. दोघेही माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे भाग होते. त्यांच्या मृत्यूचे दु:ख मला सहन होत नव्हते कारण मी त्या दोघांच्या खूप जवळ होते. आई आणि आजी गेल्यानंतर माझ्या आयुष्यात काहीच उरले नाही असे वाटले. त्याचवेळी मी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'साठीही काम करत होते. मात्र त्यांनी माझी अडचण समजून घेण्याऐवजी त्यांनी माझा छळ सुरू केला. 'तुझे वडील वारले होते, तुझ्या आजारी आईवर उपचार व्हावेत म्हणून आम्ही तुला पैसे दिले होते', असे ते वारंवार म्हणायचे. त्याचे बोलणे मला खूप त्रास देऊ लागले. त्यावेळी मी आत्महत्या करावी असे वाटू लागले होते," असे अभिनेत्री मोनिका भदौरियाने म्हटलं.

त्यानंतर अभिनेत्री मोनिका भदौरिया हिने 2019 मध्ये निर्मात्यांशी झालेल्या मतभेदामुळे शो सोडला. पण, त्यानंतर मोनिकाने असित मोदींविरोधात काहीच भाष्य केले नव्हते. याबाबतही मोनिकाने भाष्य केले आहे. "मला त्यांनी करारावर स्वाक्षरी करायला लावली होती. जेव्हा मी शो सोडला, तेव्हा मला कोणीही साथ दिली नाही. मग मी मीडियाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. जेव्हा माध्यमांना माझ्याशी बोलायचे होते तेव्हा शोच्या निर्मात्यांनी मला बॉण्डवर सही करायला लावले. ते म्हणाले, जर मी माध्यमांसमोर काहीच बोलले नाही तर तुला उर्वरित पैसे लवकर मिळतील," असेही मोनिका म्हणाली.