आशियातील 10 सेक्सी पुरूषांची यादी

एकमेव क्रिकेटर या यादीत 

Updated: Dec 6, 2019, 05:26 PM IST
आशियातील 10 सेक्सी पुरूषांची यादी

मुंबई : लंडनमध्ये बुधवारी एका सर्वेक्षणानुसार आशियातील सर्वात 10 सेक्सी पुरूषांची यादी जाहीर झाली आहे. 2019 सोबतच या दशकातील सर्वात सेक्सी आशियाई पुरूष बॉलिवूड स्टार आहे. यामध्ये अभिनेता हृतिक रोशनची निवड झाली आहे. 45 वर्षीय अभिनेता 'वॉर' आणि "सुपर 30' सिनेमांतून बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. तोच हृतिक रोशन 'सेक्सिएस्ट एशियन मेल' मध्ये अव्वल नंबरवर आहे. महत्वाचं म्हणजे गेले 10 वर्ष हृतिक रोशन या यादीत पहिल्या 10 मध्ये आहेत. हृतिक रोशनने त्याला वोट दिलेल्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

When you become the pose. Or has the pose become you?

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

10 सेक्सिएस्ट एशियन पुरूषांची यादी 1. हृतिक रोशन - 'वॉर' आणि 'सुपर 30' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चलती. 2. झायन मलिक - ब्रिटिश एशियन पॉपस्टार 3. अली झाफर 4. विवियन डेसना 5.सलमान खान 6. शाहिद कपूर 7.विराट कोहली - सेक्सिएस्ट मेनच्या यादीच विराट कोहलीचं नाव नवव्या यादीत आहे. 10 जणांच्या या यादीत विराट कोहली हा फक्त एकच स्पोर्ट्स पर्सन आहे. 8. रणबीर कपूर 9 रणवीर सिंह 10. प्रभास - 'बाहुबली' अभिनेता प्रभास देखील या सेक्सीएस्ट यादीत आहे. साऊथमधील हा एकमेव अभिनेता या यादीत असून त्याचा 10 वा क्रमांक आहे. 'बाहुबली'च्या निमित्ताने प्रभासने सिनेमांमध्ये एक वेगळीच उंची गाठली. बाहुबली 2 नंतर म्हणजे 2017 नंतर प्रभासने भारतीय अभिनेत्यांमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.