मुंबई : (Cannes) साऱ्या कलाजगताची नजर लागून राहिलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतासोबतच जगभरातील बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली. जिथं एकिकडे सर्व सेलिब्रिटी फॅशनचे नवनवीन ट्रेंड सेट करत होते, तिथेच एक महिला मात्र या रेड कार्पेटवर विवस्त्र आली आणि तिच्या येण्यानंतर इथे एकच गोंधळ माजला.
शुक्रवारी कान्समध्ये George Miller's 'Three Thousand Years of Longing' या चित्रपटाचं प्रिमीयर होतं. त्याचवेळी ही विवसस्त्र महिला तेथे आली आणि तिथे तिनं युक्रेनमध्ये महिलांवर होणाऱ्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवला.
ती महिला तिथं आली आणि तिनं अंगावर असणारे कपडे काढले. गुडघ्यांवर बसून तिनं त्या ठिकाणी आक्रोश करण्यास सुरुवात केली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. (Topless woman grabs attention at Cannes red carpet video viral )
महिलेनं विवस्त्र होताच तिथे असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी पुढाकार घेत लगेचच या महिलेच्या अंगावर कोट घालण्याचा प्रयत्न केला. या महिलेने तिच्या शरीरावर युक्रेनचा ध्वज रेखाटला होता. सोबतच 'आमच्यावर बलात्कार करणं थांबा' असं तिनं छाती आणि पोटाच्या भागावर लिहिलं होतं.
ज्या चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचवेळी तिथं चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकार उपस्थित होते. तेव्हाच आमच्यावर बलात्कार करु नका, असा आक्रोश त्या महिलेनं करण्यास सुरुवात केली होती.
रशिया युक्रेन युद्धाचे इथेही पडसाद
युक्रेनमध्ये रशियन सैन्याच्या कारवाईची सुरुवात झाल्या क्षणापासून तिथं रशियन सैन्याकडून युक्रेनच्या स्थानिक नागरिकांचा छळ केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
युक्रेनच्या महिलांवर रशियन सैन्याकडून बलात्कार केल्याच्या घटनाही घडल्या ची माहिती समोर आली. हीच घटना पाहता या सर्व अत्याचारांचा निषेध करण्यासाठी म्हणून ही महिला नाईलाजानं रेड कार्पेटवर विवस्त्र झाली. जिथं फॅशनचा उत्सव साजरा होतो, त्या कान्समध्ये एका महिलेचा आक्रोश खूप काही सांगून गेला.