VIDEO : कंगनाच्या बिनधास्त 'सिमरन'चा ट्रेलर पाहिलात का?

बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रानौत आता आपल्या आगामी सिनेमासाठी सज्ज झालीय. कंगनाच्या 'सिमरन'चा नुकताच व्हिडिओ ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Aug 8, 2017, 07:19 PM IST

मुंबई : बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रानौत आता आपल्या आगामी सिनेमासाठी सज्ज झालीय. कंगनाच्या 'सिमरन'चा नुकताच व्हिडिओ ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 

दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या 'सिमरन'मध्ये कंगनाचा क्युट आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय.

या अगोदर आलेला कंगनाचा 'रंगून' बॉक्स ऑफिसवर फिका पडला होता. परंतु, 'सिमरन'चा ट्रेलर मात्र कंगना पुन्हा एकदा बॉक्सऑफिसवर धम्माल करण्यासाठी सज्ज असल्याचं दाखवतोय. हा सिनेमा १५ सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होतोय.