Animal Video Leaked : Animal च्या सेटवरून व्हिडीओ लीक, गँगस्टर Ranbir Kapoor ने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष...

Animal Video : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यांने चाहत्याचा फोन फेकून दिल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतानाच...रणबीरच्या आगामी सिनेमा Animal च्या सेटवरील व्हिडीओ लीक झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीरचा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत.   

Updated: Jan 28, 2023, 04:46 PM IST
Animal Video Leaked : Animal च्या सेटवरून व्हिडीओ लीक, गँगस्टर Ranbir Kapoor ने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष... title=
Trending Video Ranbir Kapoor Animal Gangster look Video Leaked viral on social media

Animal Ranbir Kapoor Video Leaked  :  गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूर सोशल मीडियावर (social media Video) चर्चेत आहे. त्याचा आगामी चित्रपट 'तू झूठी मैं मक्कार'चा ट्रेलर (Tu Jhoothi Main Makkaar Trailer) रिलीज झाला आहे. त्यानंतर रणबीर आणि श्रद्धा कपूरमधील (Shraddha Kapoor) रोन्मासपासून (Ronmace Video) चाहते खूष झाले आहेत. या सिनेमात रणबीरने श्रद्धासोबत अनेक किसींग सीन (kissing video)  केले आहेत. तरदुसरीकडे सोशल मीडियावर रणबीरचा (Ranbir Kapoor ) एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात तो एका चाहत्यावर संतापला आहे. त्याने रागाच्या भरात (Angry Ranbir Kapoor) चाहत्याचा मोबाईल फोन (misbehave with fan) फेकून दिला आहे. अशातच रणबीर कपूरचा अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. त्या अजून एका आगामी चित्रपटाच्या शूटिंगचा व्हिडीओ लीक झाला आहे. 

रणबीरचा रावडी लूक!

रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आणि संदीप रेड्डी वंगाच्या (Sandeep Reddy Vanga) एनिमल (Animal ) या चित्रपटाचे शुटिंग सुरु आहे. या चित्रपटात रणबीर गँगस्टरची (Gangster) भूमिका करणार आहेत. या चित्रपटातील शूटिंगचा एक व्हिडीओ लीक झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीरचा गँगस्टर लूक चाहत्यांना पसंत पडला आहे.

निळा रंगाच्या सूटमध्ये लांब केस आणि दाढी असलेला रणबीर पहिल्यांदाच वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. रोमँटिक हिरोचा आता रावडी होणार आहे. (Trending Video Ranbir Kapoor Animal Gangster look Video Leaked viral on social media)

रणबीरला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.  या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रेंज रोव्हरच्या गाडीतून शस्त्र काढताना दिसतं आहे. तर रणबीर सिगरेट ओढताना दिसतं आहे. क्षणात तिथे अजून एक व्यक्ती येतो तोही गाडीतून शस्त्र उचलतो. रणबीर पुढे गाडीकडे वळतो. ते शस्त्रधारी लोक पुढे चालत जातात. रणबीर गाडीत कोणाशी तरी बोलतो आणि मग तोही पुढे चालत जातो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा सीन पाहून चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक आहेत. एनिमल हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. आता हा चित्रपट रिलीज झाल्यावर काय कमाल दाखवणार हे वेळच ठरवेल.