Amruta Khanvilkar : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ही चांगलीच चर्चेत असते. अमृता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिचं सोशल मीडिया अकाऊंट प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. ते सगळे तिच्या पोस्टची प्रतिक्षा करत असतात. मात्र, अनेकदा तिच्या फोटोंवर कमेंट करत काही नेटकरी तिला ट्रोल करताना दिसतात. असाच काहीस पुन्हा एकदा अमृतासोबत घडलं आहे. दरम्यान, अमृतानं यावेळी या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे. अमृता सध्या तिच्या नव्या ट्रॅव्हल सीरिजमुळे चर्चेत आहे. तिच्या याच शोच्या पोस्टवरून तिला ट्रोल करण्यात आलं आहे.
अमृताची ही नवीन सीरिज सुरु झाली असून त्याचे पाच एपिसोड प्रदर्शित झाले आहेत. हे एपिसोड प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यातील अमृताचा एक एपिसोड हा पुण्याचा आहे. त्यावरून तिला ट्रोल करण्यात आलं आहे. एका नेटकऱ्यानं तिला काम मिळत नाही असं म्हणत ट्रोल केलं. त्यावर अमृतानं संतप्त होत प्रतिक्रिया दिली आहे. नेटकरी म्हणाला, 'काम मिळेना वाटतं आंटीला…', अशी कमेंट अमृताच्या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने केली होती. या कमेंटवर प्रत्युत्तर देत अमृताने त्या नेटकऱ्याला चांगलंच सुनावलं आहे. अमृता सडेतोड उत्तर देत म्हणाली की, 'अहो आजोबा हे कामच आहे…हा प्रवासाशी संबंधित असणारा एक प्रायोजित कार्यक्रम आहे. अच्छा, तुमच्या काळात हे युट्यूब वगैरे नसेल ना? म्हणून तुम्हाला या सोशल मीडियाच्या ताकदिची कल्पना नसेल. हरकत नाही.'

हेही वाचा : 'मला अटॅक येतोय असं वाटलं, तेवढ्यात वरुण धवन धावत आला आणि...', करण जोहरचा मोठा खुलासा
दरम्यान, अमृताच्या युट्यूब चॅनलविषयी बोलायचे झाले तर तिनं ‘तिकीट टू महाराष्ट्र’ या नावाची सीरिज सुरु केली आहे. या सीरिजच्या निमित्तानं राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देताना दिसते. या सीरिजमध्ये ती सगळ्या नेटकऱ्यांना ज्यांनी या पर्यटक स्थळांविषयी काही मोजक्याच गोष्टी ऐकल्या आहेत. त्यांना यातून आणखी बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार आहेत. बॉलिवूडमधील तिचं काम म्हणायचं झालं तर तिनं ‘सत्यमेव जयते’, ‘राझी’ आणि ‘फूंक’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर काही दिवसांपूर्वीच तिचा ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटातील गाणं चांगलंच हिट झालं होतं.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.