बोनी कपूर यांच्या अडचणींमध्ये वाढ; आणखी दोन नोकर कोरोना पॉझिटीव्ह

कोरोनाची भीती... 

Updated: May 22, 2020, 02:47 PM IST
बोनी कपूर यांच्या अडचणींमध्ये वाढ; आणखी दोन नोकर कोरोना पॉझिटीव्ह
संग्रहित छायाचित्र

मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता पाहता प्रत्येकाच्याच मनात मोठ्या प्रमाणात भीती निर्माण करु लागला आहे. सुरुवातीला निर्माता करिम मोरानी आणि त्याच्या मुलींना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त पाहायला मिळालं होतं. ज्यामधून करिम आणि त्याच्या मुली सावरल्यासुद्धा. 

सेलिब्रिटी वर्तुळात कोरोनाचा हा शिरकाव इतक्यावरच थांबवा नाही, तर आता कपूर कुटुंबापर्यंतही या विषाणूची दहशत पसरली असल्याचं कळत आहे. सहास सेलिब्रिटींच्या घरी काम करण्यासाठी एकाहू अधिक नोकर असतात. पण, आता मात्र घरातील कामांमध्ये मदत करण्यासाठी येणाऱ्या या मंडळींनाही कोरोनाचा धोका असल्याचं पाहायला मिळत आहे. 

वाचा : '...तर मराठी चित्रपटांनाच याचा फायदा होईल' 

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या घरी काम करणाऱ्या एका नोकराला कोरोना झाल्याची माहिती त्यांनी दिली होती. ज्यानंतर आता त्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण त्यांच्या आणखी दोन नोकरांनाही कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर येत आहे. 

 

दिलासादायक बाब म्हणजे कपूर कुटुंबातील कोणाही व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली नाही. शिवाय ते सावधगिरी म्हणून सर्वच बाबतीत काळजी घेत आहेत. शिवाय येत्या काळात ते १४ दिवसांसाठी क्वारंटाईनही असणार आहेत. एकिकडे अडचणी वाढत असल्या तरीही बोनी कपूर हे स्वत:ची आणि त्यांच्या मुलींचीसुद्धा पूर्ण काळजी घेत आहेत. तेव्हा आता येत्या काळात त्यांच्यावर आणि साऱ्या विश्वावर असणारं कोरोना संकट टळावं ही एकच प्रार्थना सर्व स्तरांतून करण्यात येत आहे.