'या' कारणामुळे तुषार कपूर कधीच करणार नाही लग्न

मुलाच्या वाढदिवसादिवशी शेअर केली खास गोष्ट 

Updated: Jun 2, 2021, 06:24 PM IST
'या' कारणामुळे तुषार कपूर कधीच करणार नाही लग्न  title=

मुंबई : अभिनेता तुषार कपूर (Tushar Kapoor) हा सिंगल फादर आहे. सरोगसीच्या मदतीने तुषार लक्ष्यचा बाबा झाला आहे. 44 वर्षीय तुषार कपूरने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल खूप मोठ वक्तव्य केलं आहे. तुषारने आपण कधीच लग्न करणार नसल्याचं म्हटलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तुषारने आपण सिंगलच आनंदी असल्याचं म्हटलं आहे. भविष्यात लग्न करण्याचा त्याचा कोणताही प्लान नाही. तुषार म्हणतो की,'मी स्वतःला कुणा इतर व्यक्तीसोबत शेअर करू शकत नाही.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tusshar Kapoor (@tusshark89)

आता आणि भविष्यात कधीच करणार नाही लग्न 

तुषार कपूर 2016 साली लक्ष्यचा बाबा झाला. तेव्हापासून तो एकटाच लक्ष्यचा सांभाळ करत आहे. तसेच एकता कपूर देखील सिंगल मदर आहे. ती देखील तिचा मुलगा रवी कपूरचा एकट्याने सांभाळ करत आहे. तुषारने घेतलेल्या या निर्णयावर तो ठाम आहे. भविष्यात तुषार कधी लग्न करेल का असं विचारल्यावर 'कधीच नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे.' असं उत्तर दिलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tusshar Kapoor (@tusshark89)

माझा दिवस कसा संपतो हे कळतही नाही तुषार कपूर म्हणाला की,'कधीच लग्न करणार नाही. माझ्या निर्णयबाबत जर मी शाशंक असतो तर मी सिंगर पालक होण्याच्या प्रक्रियेतून कधीच गेलो नसतो. मी हा निर्णय अशावेळी घेतला जेव्हा मी पूर्णपणे हे स्विकारण्यास तयार होतो. मी योग्य निर्णय घेतला आहे. आजही माझ्याकडे एवढं काम आहे की, माझा दिवस कसा जातो? कळतंच नाही. ' दिवसभर मी इतका बिझी असतो की मला यामध्ये कुणाचा अडथळा नको. मी भविष्यातही स्वतःला कुणासोबत शेअर करू इच्छित नाही.