Tine Datta चं टॉपलेस फोटोशूट; सोशल मीडियावर चर्चा

सोशल मीडियावर फक्त टीनाचीच चर्चा 

Updated: Jun 2, 2021, 03:37 PM IST
Tine Datta चं टॉपलेस फोटोशूट; सोशल मीडियावर चर्चा

मुंबई : अभिनेत्री टीना दत्ता 'उतरन' मालिकेमुळे घराघरात पोहोचली. टीनाच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याची देखील जोरदार चर्चा रंगली आहे. अभिनेत्री टीना दत्ताने टॉपलेस फोटोशूट केलंय. या फोटोशूटमुळे सगळेच अवाक् झाले. सध्या तिचे हे टॉपलेस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

टीनाने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेयर केले आहेत. फोटो पाहून काहींना धक्का बसलाय तर काहींनी तिच कौतुक केलंय. या फोटोंमध्ये टीना दत्ताने फक्त मल्टीकलर बिकिनी परिधान केल्याचं दिसतंय. तर मोकळ्या पाठीवर तिचे केस विखुरलेले आहेत. या बोल्ड फोटोला टीनाने तितकच हटके कॅप्शन दिलंय. "हरकत नसेल तर तापमान वाढवू?" असं ती म्हणालीय. "मला वाटलं नवीन महिनात थोडा बदल हवा" अशा आशयाचं कॅप्शन तिने दिलंय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared byTinzi In TinzelTown (@tinadatta)

टीना दत्ता 'उतरन' या मालिकेमुळे घराघरात पोहचली होती. यामध्ये तिने इच्छा ही व्यक्तिरेखा साकारली होती. यामध्ये ती एका साध्या भोळ्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. त्यामुळे तिची इमेज छोट्या पडद्यावरील संस्कारी सून अशीच आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tinzi In TinzelTown (@tinadatta)

मात्र या इमेजला टीनाने आपल्या हॉट अंदाजाने खोडून काढलं आहे. टीना ही रियल लाईफमध्ये खुपचं हॉट आणि बोल्ड आहे.

ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रीय असते. तिच्या प्रत्येक फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते. टीना सध्या टीव्हीपासून दूर आहे. मात्र ती सोशल मीडियायाच्या माध्यामतून चाहत्याच्या संपर्कात आहे. टीना दत्ता सोशल मीडियावर अनेकदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. मालिकेमध्ये सोज्वळ मुलीची भूमिका साकारणाऱ्या टीनाच्या बोल्ड लूकवर चाहते घायाळ होतात. हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना मात्र टीनाने एक काळजी घेतली आहे. टीनाने तिचं कमेंट सेक्शन बंद केलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांना टीनाच्या फोटोवर कमेंट करण्याचा मार्ग बंद झाला आहे.