close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत धक्कादायक वळण, राणा दा....

झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. 

शैलेश मुसळे | Updated: Jun 17, 2019, 08:49 PM IST
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत धक्कादायक वळण, राणा दा....

मुंबई : झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. या मालिकेतील राणा दा आणि पाठक बाई यांची भूमिका ही अनेक प्रेक्षकांच्या आवडीची आहे. पण आता या मालिकेत एक धक्कादायक वळण येणार आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या सेटवरील काही फोटो लिक झाल्यानंतर जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या सेटवर काल एक फाइट सीक्वेन्स शूट झाला. यामध्ये राणाला खूप मारलेलं दिसतं आहे. सेटवर अशी कुजबूज ऐकायला मिळत होती की राणा दा मरणार आहे. खरंच राणा मरणार आहे? राणा म्हणजे हार्दिक जोशी आज शूटिंग संपवून परत मुंबईला परतल्याचं देखील कळतं आहे. कालचा सीन हा राणाचा मालिकेतला शेवटचा सीन होता असं देखील समोर आलं आहे. शूटींग संपल्यानंतर परत जाताना त्याने सगळ्यांचा निरोप घेतला. त्यामुळे या मालिकेतून राणा दा याचं पात्र खरोखरंच संपतंय का? याची उत्सूकता आता निर्माण झाली आहे.

तुझ्य़ात जीव रंगला ही मालिका ही आज घरोघरी पोहोचली आहे. राणा दा म्हणजेच हार्दिक जोशीचा मोठा फॅन फॉलोवर आहे. पण आता राणा दा मालिकेत मरणार आहे ? यामुळे अनेक चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून आहे.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजली आणि राणा दा यांच्या शिवाय बरकत, नंदिता, चंदे ही पात्रं देखील गाजली. अंजली आणि राणा यांची ही लव्ह स्टोरी प्रेक्षकांना खूपच आवडली. लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या या मालिकेत आता पुढे काय होणार याबाबत उत्सुकता कायम आहे.