अभिनेता करण कुंद्रा यांने मुंबईत खरेदी केले स्वप्नातील घर, जाणून घ्या किंमत

Karan Kundrra House In Bandra: टीव्ही अभिनेता करण कुंद्रा याने मुंबईत त्याचे ड्रीम हाऊस खरेदी केले आहे. ज्याची किंमत कोटींमध्ये सांगितली जात आहे.

Updated: May 14, 2022, 09:38 AM IST
अभिनेता करण कुंद्रा यांने मुंबईत खरेदी केले स्वप्नातील घर, जाणून घ्या किंमत title=

मुंबई : Karan Kundrra House In Bandra: टीव्ही अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundra) काही काळापूर्वी 'बिग बॉस 15' मध्ये दिसला होता. तिथे तो तेजस्वी प्रकाश (Tejashwi Prakash) हिच्या सोबतच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत होता. यासोबतच तो जेलर म्हणून 'लॉक-अप'पर्यंत पोहोचला होता. तसेच तो सध्या एक टीव्ही शो होस्ट करत आहे. 'लॉक-अप'च्या फिनालेदरम्यान तो त्याची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश (Tejashwi Prakash) हिच्यासोबत दिसला होता. दोघे बिग बॉसमध्येच भेटले होते आणि नंतर हळूहळू जवळीक वाढून त्यांचे प्रेमात रुपांतर झाले आहे. बातम्यांनुसार दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, लग्नाआधी त्याने नवं घर घेतलंय, या आलिशान फ्लॅटची किंमत करोडोंमध्ये असल्याचं बोललं जात आहे. 

करण कुंद्राविषयी अशी चर्चा आहे की, त्याने मुंबईतील वांद्रे येथे एक आलिशान घर घेतले आहे, त्याच्या अपार्टमेंटमधून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. करण याचा हा अपार्टमेंट समुद्राभिमुख असून त्याच्या अपार्टमेंटमधून समुद्राचे दर्शन घेता येते. समुद्राभिमुख असण्यासोबतच घराला खासगी लिफ्ट आणि स्विमिंग पूल आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याने हा फ्लॅट 20 कोटींहून अधिक रुपयांना विकत घेतला आहे. करण गेल्या काही महिन्यांपासून चांगल्या घराच्या शोधात होता आणि आता त्याला हे स्वप्नातील घर सापडले आहे.

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची जोडी चाहत्यांना खूप भावली आहे. त्याचे चाहते त्याला प्रेमाने 'तेजरन' म्हणतात. या दोघांची प्रेमकहाणी टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस 15'च्या सेटवर सुरु झाली. त्यादरम्यान दोघांनीही त्यांच्या प्रेमाचा खुलेपणाने स्वीकार केला होता. शोमधून बाहेर पडल्यानंतरही ही जोडी एकत्र दिसली आहे. अनेकदा हे दोघे डिनर डेटवर एकत्र दिसले आहेत. आता त्यांच्या लग्नाची बातमी आहे. त्यासाठी हे नवं घर घेतल्याचे बोलले जात आहे.