ज्येष्ठ अभिनेत्री नीलू कोहलींवर कोसळला दुःखाचा डोंगर; बाथरूममध्ये आढळला पतीचा मृतदेह

Nilu Kohli Husband Death : प्रसिद्ध अभिनेत्री नीलू कोहली यांचे पती हरमिंदर सिंग यांचे शुक्रवारी निधन झाले. नीलू कोहली यांचे पती हरमिंदर सिंग हे पूर्णपणे निरोगी होते. शुक्रवारी दुपारी ते गुरुद्वारातही गेले होते. मात्र घरी परतल्यानंतर बाथरुममध्ये त्यांचा मृत्यू झाला.  

Updated: Mar 25, 2023, 09:45 AM IST
ज्येष्ठ अभिनेत्री नीलू कोहलींवर कोसळला दुःखाचा डोंगर; बाथरूममध्ये आढळला पतीचा मृतदेह title=

Nilu Kohli Husband Death : मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. अनेक टीव्ही शो, चित्रपटांमध्ये आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री नीलू कोहली (Nilu Kohli) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्री नीलू कोहली यांचे पती हरमिंदर सिंग कोहली (Harminder Singh Kohli) यांचे निधन झाले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, हरमिंदर सिंग हे  शुक्रवारी सकाळी गुरुद्वारातून घरी परतल्यानंतर बाथरूममध्ये गेले होते. त्यानंतर हरमिंदर सिंग हे तिथेच कोसळले. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी घरात त्यांच्यासोबत घरकामासाठी असलेली एक व्यक्ती उपस्थित होता.

मृत्यूपूर्वी हरमिंदर सिंग यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुद्वारातून हरमिंदर सिंग घरी आल्यानंतर बाथरुममध्ये गेले होते. त्यानंतर ते परत बाहेर आलेच नाहीत. बराच वेळ बाहेर न आल्याने घरकामासाठी असलेल्या व्यक्तीने बाथरुममध्ये जाऊन पाहिले तेव्हा त्याला धक्का बसला. बाथरुममध्ये हरमिंदर सिंग खाली पडलेले होते. हरमिंदर सिंग यांना त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचण्याआधीच हरमिंदर सिंग यांचा मृत्यू झाला होता.

हरमिंदर सिंग गुरुद्वारातून परतल्यानंतर बाथरुममध्ये गेले होते. त्यावेळी घरी हरमिंदर सिंग आणि घरकामासाठी असलेली व्यक्ती असे दोघेच उपस्थित होते. घरकामासाठी असलेली व्यक्ती हरमिंदर सिंग आले त्यावेळी तो जेवणाची तयारी करत होता. दुपारच्या जेवणासाठी तो हरमिंदर सिंग बाथरूममधून बाहेर येण्याची वाट पाहत होता. मात्र, बराच वेळ होऊनही हरमिंदर सिंग बाथरूममधून बाहेर न आल्याने त्याने बेडरूममध्ये जाऊन पाहिले. बेडरुमध्ये नसल्याने त्याने बाथरुममध्ये जाऊन पाहिले. त्यावेळी त्याला हरमिंदर सिंग बाथरुममध्ये पडलेले दिसले. हरमिंदर सिंग यांना मधुमेह होता पण ते पूर्णपणे निरोगी होते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

हरमिंदर यांच्यावर रविवारी अंतिम संस्कार होणार आहेत. त्यांचा मुलगा अद्याप परदेशात असल्याने तो आल्यानंतरच हरमिंदर सिंग यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे, असे नीलू कोहली यांच्या जवळच्या मैत्रिणीने सांगितले. दरम्यान, नीलू कोहली यांनी हाउसफुल 2, पटियाला हाऊस, हिंदी मीडियम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.