kapil sharma कडे जेव्हा चाहत्याने मागितलं काम तेव्हा कपिलने असं दिलं उत्तर

याआधी सोशल मीडियावरील एका पोस्टच्या माध्यमातून कपिल शर्मा या शोमध्ये नवीन अभिनेता आणि लेखकांना काम देण्याबाबत उल्लेख केला होता.

Updated: Apr 7, 2021, 06:53 PM IST
kapil sharma कडे जेव्हा चाहत्याने मागितलं काम तेव्हा कपिलने असं दिलं उत्तर title=

मुंबई : अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्मा हे इंडस्ट्रीमधील एक नावाजलेलं नाव आहे. कपिल शर्माचा प्रसिद्ध 'द कपिल शर्मा शो' यावर्षीच्या फेब्रुवारीपासून बंद आहे. शो बंद झाल्यानंतर कपिलच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र नुकतच एक ट्विट करत हा शो पुन्हा सुरु होणार असल्याची घोषणा केली आहे. हा शो 2021 मे पासून पुन्हा प्रसारित होईल. दरम्यान, या घोषणेनंतर कपिलच्या एका चाहत्याने त्याच्याबरोबर काम करण्याची इच्छा सोशल मीडियावर व्यक्त केली होती. चाहत्यांच्या या प्रश्नावर कपिलने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे.

मंगळवारी संध्याकाळी कपिलने आपल्या अनेक चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे सोशल मीडियावरुन दिली. यावेळी कपिलच्या एका चाहत्याने त्याला विचारलं- "मला तुझ्याबरोबर काम करायचं आहे." मला संधी मिळेल का? यावर, 'कपिलने स्वत: च्या शैलीत उत्तर दिले आणि लिहिले- 'मी सध्या घरी बसलो आहे भाऊ. ' कपालीचा हा प्रतिसाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर भाष्य करून चाहते त्यांच्या उत्तरावर प्रतिक्रिया देत आहेत.

याआधी सोशल मीडियावरील एका पोस्टच्या माध्यमातून या शोमध्ये नवीन अभिनेता आणि लेखकांना काम देण्याबाबत उल्लेख केला होता. कपिल शर्माने नुकतिच ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने सांगितलं की, माझी निवड झाली आहे, आता तुमची पाळी. याचबरोबर कपिलने एक पोस्ट रिट्वीट करत. या ट्विटमध्ये असे लिहिलं आहे की, 'कपिल शर्माची टीम लेखक आणि कलाकार शोधत आहे, ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे.ती भारताला हसवण्याची.

त्याचवेळी 'द कपिल शर्मा शो'मध्ये सपनाची भूमिका साकारणार्‍या कृष्णा अभिषेकनेही याबाबत खुलासा केला. कृष्णा अभिषेकने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, 'द कपिल शर्मा शो' मे मध्ये ती कमबॅक करत आहे. 