छोट्या पडद्यावर पुन्हा दाखल होणार 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिका

'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिका पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज....  

Updated: Feb 16, 2022, 03:58 PM IST
छोट्या पडद्यावर पुन्हा दाखल होणार 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिका  title=

मुंबई : छोट्या पडद्यावर एकेकाळी लोकप्रिय झालेली मालिका 'क्योंकी सास भी कभी बहू थी' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. टीव्ही क्विन एकता कपूरने याबाबत मोठी घोषणा केली आहे.  'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. मालिकेप्रति लोकांचं प्रेम पाहिल्यानंतर एकता कपूर मलिका पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली.

एकता कपूरने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मालिका पुन्हा सुरू होत असल्याती माहिती दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. एकताने कॅप्शनमध्ये 'मालिका प्रेक्षकांना स्टार प्लसवर बुधवारी 5वाजता पाहाता येणार...' असल्याचं सांगितलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

म्हणजे 16 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांना टीव्हीवर मालिका पाहाता येणार आहे. मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिका 2000 साली सुरू झाली. 

त्यानंतर 2008 साली मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.. अनेक कलाकारांना मालिकेतून लोकप्रियता मिळाली. आज मालिकेतील काही कलाकार यशाच्या उच्च शिखरावर आहेत. तर काही बॉलिवूडमध्ये काम करतात.   

स्मृती ईराणी, करिश्मा तन्ना, मौनी रॉय, पुलकित सम्राट, अमर उपाध्याय, रोनित रॉय आणि हितेन तेजवानी अनेक कलाकारांच्या करियरला मालिकेमुळे वेगळी दिशा मिळाली.