केजरीवाल यांच्या मंकी कॅपवर ट्विंकलचं ट्विट; फोटो व्हायरल

ट्विकलने केलेलं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Apr 20, 2019, 04:22 PM IST
 केजरीवाल यांच्या मंकी कॅपवर ट्विंकलचं ट्विट; फोटो व्हायरल

नवी दिल्ली : सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना मोठ्या पडद्यापासून दूर असूनही काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत असते. ट्विंकल खन्ना तिच्या अदाकारी, सौदर्य, हुशारी आणि हजरजबाबीपणामुळे चर्चेचा विषय ठरते. ट्विंकल सोशल मीडिया साइट्सवर अॅक्टिव्ह असते.  

शुक्रवारी ट्विकलने केलेलं एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विंकलने तिच्या या ट्विटमधून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खिल्ली उडवली आहे. ट्विंकलने शेअर केलेल्या पोस्टमध्ये एका लहान मुलाने आपल्या डोक्यावर अंतर्वस्त्र घातलं आहे. हा फोटो शेअर करत ट्विंकलने 'जेव्हा तुम्ही केजरीवाल यांचे सपोर्टर असता परंतु तुमच्याकडे मंकी कॅप नसते.' असं म्हटलं आहे. त्यापुढे तिने मी त्याला असं करायला सांगितलं नसल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे. 

ट्विंकलच्या या ट्विटनंतर हा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. ट्विंकल खन्नाचे सोशल मीडियावर अनेक फॉलोवर्स आहेत. #MeToo मोहिमेत अभिनेत्री तनुश्री दत्ताने पुढे येऊन बोलल्याबद्दल ट्विंकलने प्रशंसा केली होती. ट्विंकल खन्ना लिहिलेल्या तीन पुस्तकांनंतर आता अभिनेत्रीनंतर ती एक लेखिका म्हणूनही पुढे आली आहे.