close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

VIDEO : अक्षय म्हणतो, बायकोला मार्शल आर्टस शिकवाल तर हेच होईल...

अक्षयनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक गोड व्हिडिओ शेअर केलाय

Updated: Jan 18, 2019, 11:49 AM IST
VIDEO : अक्षय म्हणतो, बायकोला मार्शल आर्टस शिकवाल तर हेच होईल...

मुंबई : बॉलिवूडचं पॉवर कपल म्हणून ओळखलं जाणारे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या लग्नाला १८ वर्ष पूर्ण झालेत. याच निमित्तानं अक्षयनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत 'आपण एवढी वर्ष ट्विंकलसोबत कशी काढली' हे सांगितलंय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ हीट ठरलाय. 

'तुम्ही मार्शल आर्ट एक्सपर्ट असताना जेव्हा तुम्ही तिला काही क्लुप्त्या सांगता, तेव्हा ती तुम्हालाच पंचिंग बॅग म्हणून वापरते. अशाच पद्धतीनं १८ वर्ष निघून गेलीत...' असं अक्षयनं हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलंय. 

या व्हिडिओमद्ये अक्षयची पत्नी ट्विंकल बॉक्सिंग करताना अक्षयलाच प्रेमानं पंच ठेवून देतना दिसतेय. 

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचा विवाह १७ जानेवारी २००१ रोजी झाला होता. रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टीसोबत नातं चर्चेत असताना अचानक अक्षयनं ट्विंकलसोबत सात फेरे घेत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. ट्विंकल - अक्षय या दाम्पत्याला आरव आणि नितारा ही दोन मुलंही आहेत. लग्नानंतर ट्विंकल इंडस्ट्रीपासून दूर झाली. आता ती लेखिका म्हणून लोकांसमोर आलीय.