उबुंटू सिनेमाचं टायटल ट्रॅक हिट

 उबुंटू. उबुंटूचा पहिला प्रोमो प्रकाशित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उबुंटूविषयी उत्सुकता वाढली आहे. 

Updated: Sep 8, 2017, 06:28 PM IST

मुंबई : मराठीत आणखी एक चांगला सिनेमा येऊ घातला आहे, उबुंटू. उबुंटूचा पहिला प्रोमो प्रकाशित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उबुंटूविषयी उत्सुकता वाढली आहे. 
उबुंटूचं संगीत देखील उत्तम झालं आहे, कारण या सिनेमाचं टायटल ट्रॅक साँगही चांगलंच लोकप्रिय झालं आहे. मुग्धा वैशंपायन यांनी हे गीत गायलं आहे, एकंदरीत या गाण्याला चांगली लोकप्रियता मिळताना दिसत आहे.