Urfi Javed Faced Casting Couch: सोशल मीडिया सेन्सेशनल उर्फी जावेदने हिनं (Urfi Javed) तिच्या अतरंगी स्टाईलने स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा तिच्या स्टाईलचे सोशल मीडियावर (Social Media) कौतूक केले जाते तर अनेकदा तिला नेटकरी ट्रोल देखील करतात. ती कोणतंही आउटफिट ज्या आत्मविश्वासाने घालते तो आत्मविश्वास काहींना आवडतो. उर्फी ही तिच्या चाहत्यांचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन मनोरंजन करत असते. आज तिने इडंस्ट्रीमध्ये स्थान मिळवण्यासाठी बऱ्याच मार्गांचा वापर केला. तिला देखील इतर अभिनेत्रींप्रमाणे कास्टिंग काउचसारख्या प्रक्रियेला सामोरे जावे लागले. तिनं एका मुलाखतीदरम्यान कास्टिंग काउचवरील तिचा अनुभव आणि अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.
तिलाही अनेक मुलींप्रमाणे कास्टिंग काउचसारख्या धक्कादायक प्रकाराचा सामना करावा लागला होता. तिला जबरदस्तीने या प्रक्रियेत ढकलण्यात आले होते. पण ती स्वत:ला भाग्यवान समजते की ती टाळण्यात यशस्वी झाली.' कोणाचेही नाव न घेता उर्फीनं तिचा कटू अनुभव सगळ्यांसोबत शेअर केला. ती अनेक बड्या लोकांच्या माध्यमातून कास्टिंग काउचची शिकार झाली होती.' तिनं त्या व्हिडिओमध्ये अनेक गोष्टींचा खूलासा केला. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी त्या व्हिडिओवर कमेंट करुन तिचे सांत्वन केले.
उर्फीनं त्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. तिनं जेव्हा ठरवलं की तिला बॉलिवूडमध्ये यायचे आहे तेव्हा तिनं घरातून पळ काढला. तिला कुटूबांचा कोणत्याही प्रकारचा आधार नव्हता. जेव्हा ती मुंबईत आली, तेव्हा तिच्याकडे पैसे देखील नव्हते. जेव्हा ती कामाच्या शोधात होती तेव्हा एका निर्मात्याने तिला वेब सीरिजची ऑफर दिली. त्या वेब सीरिजसाठी त्याला बोल्ड सीन करायला लावले गेले. जेव्हा तिने बोल्ड सीन करण्यास नकार दिला तेव्हा तिला तुरुंगात पाठवण्याची धमकी देण्यात आली.' उर्फी जावेद स्वतःला नशीबवान म्हणते आणि तिनं तिथून स्वत:ची सुटका करण्यात यशस्वी झाल्याचे सांगते.
या कास्टिंग काउच चित्रविचित्र अनुभवांना सगळ्याच अभिनेत्री जात असतात. काहीजणी हिम्मत दाखवून सगळ्यांसमोर त्या मान्य करतात तर काही शांत बसण्यात समजूतदारपणा दाखवतात. आजही अनेक मुली ज्या गावातून किंवा खेड्यातून स्वत:चे नशीब चमकवण्यासाठी येतात त्यांना कास्टिंग काउचसारख्या अनुभवांना सामोरे जावं लागतं.