Urfi Javed Lalbagh : गणपती बाप्पाच्या आगमनाला सहा दिवस झाले. गणेशोत्सवाचे जोरात स्वागत झाले आहे. त्यात मुंबईतील गणेशोत्सव म्हणजे काही वेगळीच धम्माल असते. मुंबईतील गणपती पाहायला प्रेक्षक लांबून लांबून येतात. एकदा तरी बाप्पाचे दर्शन घ्यावे अशी त्यांची इच्छा असते. त्यासाठी कितीही गर्दी असली तरी भक्त आपल्याला तिथे पाहायला मिळतात. सगळ्यात जास्त चर्चेत असणार गणपती हा लालबागचा राजा आहे. लालबागच्या राज्याला प्रेक्षक गर्दी करून दर्शन घेतात. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दुसऱ्या राज्यातून देखील अनेक लोक येतात. अनेक लोक तर संपूर्ण रात्र ही लाईनमध्ये राहुन दर्शन घेतात. तर दुसरीकडे सेलिब्रिटी हे कोणत्याही लाईनमध्ये उभ न राहता बाप्पाचे दर्शन घेताना दिसतात. त्यापैकी नेहमीच चर्चेत राहणारी सेलिब्रिटी म्हणजे उर्फी जावेद. उर्फीनं देखील यंदा लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. तर उर्फीनं व्हीव्हीआयपींसाठी असलेल्या दर्शनाच्या रांगेतून बाप्पाचे आशीर्वाद घेतल्यानं मुंबई डबेवाला असोसिएशनने यावरून संताप व्यक्त केला आहे.
उर्फी जावेदला लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी व्हीव्हीआयपी गेटमधून प्रवेश दिला. तिच्या हस्ते बाप्पाची आरती देखील करण्यात आली. हे पाहता मुंबई डबेवाला असोसिएशननं संताप व्यक्त केला आहे. सर्व गणेश भक्तांना रात्र रात्रभर रांगेत उभं रहावं लागतं आणि त्यानंतर त्यांना बाप्पाचे दर्शन मिळते. इतकंच नाही तर फक्त रात्री नाही तर भक्त हे अचानक अवकाळी येणाऱ्या पावसाचा देखील सामना करत होते. सगळ्यांनी इतकी दगदग आणि प्रतिक्षा केल्यानं बाप्पाचे दर्शन मिळते. तर उर्फी जावेदला कोणत्या गोष्टीसाठी व्हीव्हीआयपी गेटमधून प्रवेश देत बाप्पाचे दर्शन करू दिलं जाते. या प्रकरणावर मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी जे झालं ते चुकीचं घडलं आहे असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा : सई ताम्हणकरनं दिली गौतमी देशपांडेच्या रिलेशनशिपची हिंट! 'या' अभिनेत्या करते डेट?
उर्फीनं थेट जात व्हीव्हीआयपी रांगेतून दर्शन घेणं ही खूप मोठी गोष्ट होती. अनेकांनी या गोष्टीचा विरोध केला आहे. उर्फीचं देशासाठी आणि समाजासाठी काय योगदाण आहे की त्यासाठी थेट दर्शन दिलं असा सवाल डबेवाल्यांनी केला आहे. लालबागच्या राजाच्या मंडळाकडून भक्तांमध्येच हा भेदभाव का केला जात आहे? त्यांच्यातला हा भेदभाप प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाही. उर्फीला सर्वसाधार लोकांच्या रांगेतून दर्शन द्यायला हवे होते असे अनेकांनी कमेंट केल्या आहेत. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.